वसई विरार मनपा निवडणुकीत ५४७ उमेदवार रिंगणात; २८६ उमेदवारांनी घेतले उमेदवारी अर्ज मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 13:07 IST2026-01-03T13:06:45+5:302026-01-03T13:07:06+5:30
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी केवळ ४४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. मात्र, आज शेवटच्या दिवशी तब्बल २८६ उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट झाले आहे.

वसई विरार मनपा निवडणुकीत ५४७ उमेदवार रिंगणात; २८६ उमेदवारांनी घेतले उमेदवारी अर्ज मागे
नालासोपारा : वसई विरार महानगरपालिका निवडणुकीत शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी एकूण २८६ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. आता ५४७ उमेदवार रिंगणात असल्याने निवडणुकीच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी केवळ ४४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. मात्र, आज शेवटच्या दिवशी तब्बल २८६ उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज भाजपच्या माजी नगरसेवकांने उमेदवारी दाखल करत भाजपच्याच विरोधात चौघांचे एक पॅनल उभे केले आहे. परंतु भाजपचे काही नाराज अजूनही अपक्ष उमेदवारी भरून मैदानात असल्याने लढतीतील रंगत वाढली आहे.
मुख्य राजकीय पक्षांच्या युती मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार मैदानात उतरल्याने अनेक प्रभागांत बहुकोनी लढती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपक्ष उमेदवारांची वाढलेली संख्या ही वसई विरार मनपा निवडणुकीचे प्रमुख वैशिष्ट्य ठरत असून, स्थानिक प्रश्नांवर थेट मतदारांशी संवाद साधत हे उमेदवार प्रचारात सक्रिय झाले आहेत. यामुळे काही प्रभागांत पक्षीय उमेदवारांसमोरही कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पक्षनिहाय उमेदवार
बहुजन विकास आघाडी - ११३, भाजप - ८८, शिंदेसेना - २७, राष्ट्रवादी (अजित पवार) - १७, उद्धवसेना - ९१, काँग्रेस - १३,
मनसे - २
क्र. कार्यालय वॉर्ड क्र वैध अर्ज मागे अर्ज अंतिम संख्या
१) प्रभाग समिती ए २,५,१२ ५८ १८ ४०
२) प्रभाग समिती बी ६,९,१०,१६ ९३ १५ ७८
३) प्रभाग समिती सी १,३,४,७ १०९ ५० ५९
४) प्रभाग समिती डी १५,१७,२२ ८३ १५ ६८
५) प्रभाग समिती ई ११,१३,१४ ८९ ३९ ५०
६) प्रभाग समिती एफ ८,१८,१९ ११६ ४२ ७४
७) बहुउद्देशीय इमारत फादरवाडी २०,२१,२७ १०८ ४२ ६६
८) प्रभाग समिती एच २३,२४,२६ ९१ ३७ ५४
९) प्रभाग समिती आय २५,२८,२९ ८६ २८ ५८
८३३ २८६ ५४७