एसटीची भाडेवाढ कमी करण्याकरिता उद्धवसेनेकडून आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 17:06 IST2025-01-31T17:05:45+5:302025-01-31T17:06:35+5:30

Wardha : १४ टक्याहून एसटीचे अधिक प्रवास भाडे वाढले आहे

Uddhav Sena's agitation to reduce ST fare hike | एसटीची भाडेवाढ कमी करण्याकरिता उद्धवसेनेकडून आंदोलन

Uddhav Sena's agitation to reduce ST fare hike

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अचानक भाडेवाढ केल्याने ही भाडेवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी उद्धव ठाकरे सेनेच्यावतीने बसस्थानकासमोर आंदोलन करण्यात आले. माजी राज्यमंत्री अशोक शिंदे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खुपसरे तथा तालुकाप्रमुख सतीश धोबे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करून शासनास निवेदन पाठविण्यात आले.


महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे देशातील सर्वात मोठे सार्वजनिक वाहतूक सेवेपैकी एक आहे. एस.टी. महामंडळाच्या ताब्यात जवळपास पंधरा हजार बसेस असून, दररोज सुमारे ५५ लाख प्रवासी वाहतूक करतात. एसटी महामंडळाच्या राज्याच्या गृह (वाहतूक) विभागाचे मुख्य सचिव आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १४.९५ टक्के इतकी भाडेवाढ करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला ही कात्री बसणार आहे. 


अनेकांची उपस्थिती होती
एसटीची झालेली भाडेवाढ हे सर्व सामन्य नागरिकांना झळ पोहचविणारी आहे. त्यामुळे ही भाडेवाढ रद्द करण्याची मागणी या आंदोलनातून केली आहे. या आंदोलनात उपतालुकाप्रमुख प्रकाश अनासाने, माजी नगरसेवक मनीष देवडे, भास्कर ठवरे, नितीन वैद्य, गजानन काटवले, श्रीधर कोटकर, शीतल चौधरी, शंकर मोहमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते श्रीकांत भगत, अनंता गलांडे, प्रकाश घोडे, योगेश कामडी, गोवर्धन शाहू, हिरामण आवारी, नरेंद्र गुळकरी, सुधाकर डंभारे, सुभाष काटकर, लक्ष्मण कापकर, जानू पडवे, गुणवंतराव वानखडे उपस्थित होते. 


वर्ध्यात बसस्थानकासमोर चक्का जाम आंदोलन बसच्या भाडेवाढ विरोधात उद्धव ठाकरे
सेनेच्यावतीने वर्धा शहरातील मुख्य बसस्थानकासमोर चक्का जाम आंदोलन केले. या आंदोलनात वर्धा जिल्हाप्रमुख आशिष पांडे यांच्या नेतृत्वात देवळी उपजिल्हा प्रमुख रमेश कडू, वर्धा शहरप्रमुख मिलन गांधी, देवळी तालुकाप्रमुख सतीश बोरसे, युवासेना जिल्हा अधिकारी शार्दूल वांदिले, कुमार हातागडे, रितेश इमले, रोहित निगम, गोपाल सबळ, सतीश नायर, बाबाराव पवार, अकील शेख, आकाश दगवार, विक्की शेंडे, अमन नारायने, अमोल ठाकरे, श्रीकांत चिमूरकर, गौरव गोमासे, आशिष मोहोड, गजानन जाधव, ईशाद शाह, नीतेश नाडे, संभव इंगोले यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.


 

Web Title: Uddhav Sena's agitation to reduce ST fare hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :wardha-acवर्धा