दोन दूचाकींची धडक, दोघे ठार, तिसरा गंभीर
By चैतन्य जोशी | Updated: October 31, 2023 19:30 IST2023-10-31T19:29:55+5:302023-10-31T19:30:24+5:30
पुलगाव-वर्धा रस्त्यावरील अपघात

दोन दूचाकींची धडक, दोघे ठार, तिसरा गंभीर
पुलगाव : दोन दुचाकींची समाेरासमोर धडक झाल्याने दोन युवकांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात पुलगाव ते वर्धा रस्त्यावर ३० रोजी रात्रीच्या सुमारास झाला. याप्रकरणी पुलगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
शुभम खोबरे (२८) रा. बरांडा, स्वप्नील धाबर्डे (३१ रा. रमाई नगर) यांचा मृत्यू झाला. तर संकेत कुंजम (१९) रा. बरांडा हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. प्राप्त माहितीनुसार, शुभम खोबरे आणि संकेत कुंजम हे दोघे एमएच ३२. एसी. ५२८३ क्रमांकाच्या दुचाकीने वर्ध्याला जात होते. दरम्यान समोरुन भरधाव येणाऱ्या एम.एच. ३२ एटी. ५७७६ क्रमांकाचा दुचाकी चालक स्वप्नील धाबर्डे याने निष्काळजीपणे दुचाकी चालवून समोरील दुचाकीला जबर धडक दिली.
पुलगाव नजीकच्या मोहित धाब्याजवळ दोन्ही दुचाकींची धडक झाली. या अपघातात संकेत कुंजम याचा जागीच मृत्यू झाला. तर स्वप्नील धाबेर्डे याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. शुभम खोबरे याच्यावर उपचार सुरु आहे. या अपघाताची नोंद पुलगाव पोलिसांनी घेतली आहे.