आईचा हात सुटला अन् कार्यक्रमातून दिव्यांग मुलगी बेपत्ता

By चैतन्य जोशी | Updated: October 14, 2023 17:13 IST2023-10-14T17:13:06+5:302023-10-14T17:13:24+5:30

‘दिव्यांग दारी’ मेळावा : सेवाग्राम ठाण्यात तक्रार

The mother lost her hand and the disabled girl went missing from the program | आईचा हात सुटला अन् कार्यक्रमातून दिव्यांग मुलगी बेपत्ता

आईचा हात सुटला अन् कार्यक्रमातून दिव्यांग मुलगी बेपत्ता

वर्धा : सेवाग्राम येथे आयोजित दिव्यांग मेळावा कार्यक्रमासाठी दाखल झालेल्या दिव्यांग मुलीचा उसळलेल्या गर्दीत तिच्या आईच्या हातातून हात सुटला आणि ती बेपत्ता झाली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून सेवाग्राम ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

१३ रोजी शुक्रवारी ‘दिव्यांगांच्या दारी’ या कार्यक्रमाची सुरुवात सेवाग्राम येथून करण्यात आली. कार्यक्रमात जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधवांनी हजेरी लावली होती. जिल्हा प्रशासनाकडून लाभार्थ्यांना ने-आण करण्यासाठी विनामुल्य वाहनांची व्यवस्थाही केली होती. कारंजा तालुक्यातील पारडी येथून जवळपास तीस जण आलेले होते. यात रूक्साना परवीन शेख चांद शेख (२७) ही दिव्यांग मुलगी तिच्या आईसोबत आलेली होती. कार्यक्रमस्थळी आल्यानंतर तिची आई तिला घेऊन स्टॉलवर नोंदणी करीत असतानाच आईच्या हातातून मुलीचा हात सुटला.

नोंदणी प्रक्रिया आटोपून रुक्सानाची आई परत त्या ठिकाणी गेली असता तिला मुलगी दिसून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही रुक्साना मिळून न आल्याने आई रेहना बी शेख चांद शेख यांनी सेवाग्राम पोलिसात मुलगी हरविल्याची तक्रार दिली.

Web Title: The mother lost her hand and the disabled girl went missing from the program