सोयाबीन बियाणे १०० टक्के अनुदानावर मोफत उपलब्ध; शेतकऱ्यांनो असा घेता येणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 18:21 IST2025-05-29T18:14:45+5:302025-05-29T18:21:22+5:30

Vardha: २९ मे पर्यंत शेतकऱ्यांना करता येणार बियाण्यासाठी अर्ज

Soybean seeds are available free of cost at 100 percent subsidy; Farmers can avail these benefits | सोयाबीन बियाणे १०० टक्के अनुदानावर मोफत उपलब्ध; शेतकऱ्यांनो असा घेता येणार लाभ

Soybean seeds are available free of cost at 100 percent subsidy; Farmers can avail these benefits

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत गळीतधान्य योजनेंतर्गत आता शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर मोफत प्रमाणित सोयाबीन बियाणे उपलब्ध होणार आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी २९ मेपर्यंत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत अशा महाडीबीटी https://mahadbt.maharashtra.g ov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेताना अॅग्रिस्टॅकवर नोंदणी असणे बंधनकारक आहे. अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना ५ वर्षाच्या आतील बियाणे तालुकास्तरावरील डीलरकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना सहजपणे बियाणे प्राप्त करून घेता येणार आहे.


एक हेक्टरसाठी बियाणे
योजनेचा लाभ किमान २० आर ते कमाल १ हेक्टर क्षेत्रासाठी घेता येईल. बीबीएफ, रुंद वरंबा सरी, टोकन पद्धतीने लागवडीकरिता एकरी २२ किलो, याप्रमाणे एका शेतकऱ्यास जास्तीतजास्त २ बॅगचा लाभ दिला जाणार आहे.


अशी होणार निवड
पीक प्रात्याक्षिकाची अंमलबजावणी करताना, शेतकरी निवड सर्वसाधारण ७५ टक्के, अनुसूचित जाती १७टक्के, अनुसूचित जमाती ८ टक्के याप्रमाणे करण्यात येईल. यामध्ये लाभार्थ्यांपैकी ३० टक्के महिलांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्याच्या याद्या २९ मे रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोर्टलवर उपलब्ध होर्डल. तसेच निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाइलवर वैयक्तिक संदेशही प्राप्त होतील. ५ दिवसांच्या आत बियाण्याची उचल करून घेणे आवश्यक आहे.


तूर व सोयाबीन प्रात्यक्षिकासाठी १०० टक्के अनुदानावर बियाणे
पात्र लाभार्थी- जे शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था यांची २४ मार्च २०२४ पूर्वी आत्मा, महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियान, राष्ट्रीय ग्रामीण जीवोन्नती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ, नाबार्ड इत्यादी संस्थाकडे नोंदणी आहे. अशा शेतकरी गटांना तूर आणि सोयाबीन पिकाच्या प्रात्यक्षिकाकरिता १०० टक्के अनुदानावर मोफत बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


"या योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास आणि आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत मिळणार आहे. विशेषतः सोयाबीन लागवडीसाठी होणारा बियाण्याचा खर्च पूर्णपणे वाचणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोफत बियाणे योजनेचा लाभघ्यावा."
- शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वर्धा.

Web Title: Soybean seeds are available free of cost at 100 percent subsidy; Farmers can avail these benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.