धक्कादायक! जन्मदात्या पित्याकडून पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2022 12:02 IST2022-09-07T11:53:45+5:302022-09-07T12:02:20+5:30

सतत तीन वर्षे केलं घृणास्पद कृत्य

Shocking! Sexual abuse of unborn daughter by biological father | धक्कादायक! जन्मदात्या पित्याकडून पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल

धक्कादायक! जन्मदात्या पित्याकडून पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल

अल्लीपूर (वर्धा) : मुली आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना काही थांबताना दिसून येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना एका गावातून समोर आली आहे. वडिलांनी आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी बापाविरुद्ध अल्लीपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार, अल्लीपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावातील रहिवासी नराधम बाप मागील तीन वर्षांपासून त्याच्या १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करीत आहे. पीडिता ही बारावीत शिकत असून, तिने याबाबतची माहिती तिच्या शाळेतील शिक्षिकेला सांगितली.

शिक्षिकेने घटनेचे गांभीर्य पाहून तत्काळ जिल्हा बाल संरक्षण समिती व चाइल्ड लाइन केंद्राला याबाबत कळविले. चाइल्ड लाइनचे जिल्हा समन्वयक आशिष मोडक, वैशाली मिस्कीन यांनी थेट अल्लीपूर पोलीस ठाणे गाठून याची माहिती पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तत्काळ याप्रकरणात पीडितेच्या बयाणावरून नराधम बापाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गाडे करीत आहेत.

Web Title: Shocking! Sexual abuse of unborn daughter by biological father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.