भरधाव कारने पादचारी वृद्धास चिरडले; जागीच ठार

By चैतन्य जोशी | Updated: February 28, 2023 16:34 IST2023-02-28T16:33:21+5:302023-02-28T16:34:16+5:30

पुलगाव येथील अपघात

Pedestrian crushed by speeding car; Death on the spot | भरधाव कारने पादचारी वृद्धास चिरडले; जागीच ठार

भरधाव कारने पादचारी वृद्धास चिरडले; जागीच ठार

वर्धा : पायदळ घरी जात असलेल्या वयोवृद्धाला भरधाव कारने मागाहून धडक दिली. या अपघातात वयोवृद्धाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पुलगाव ते आर्वी मार्गावरील दखनी फैल परिसरात २७ रोजी रात्री झाला. याप्रकरणी पुलगाव पोलिसांत कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गणपत रघुनाथ मारकड (६०) रा. गौरक्षणफैल पुलगाव असे मृतकाचे नाव आहे.

गणपत मारकड हे घरी आर्वी मार्गाने घराकडे जात होते. दरम्यान मागाहून सुसाट आलेल्या एम.एच. ३१ डी.सी. १८५४ क्रमांकाच्या कारचालकाने निष्काळजीपणे व हयगयीने कार चालवून गणपतला जबर धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की गणपत काही दूर फरफटत गेला.त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने अतिरक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी महेंद्र विनायक मारकड याने पुलगाव पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. तसेच आरोपी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Pedestrian crushed by speeding car; Death on the spot