‘मेरे सपने बडे है, उसे पुरा करने जा रही हूँ’, चिठ्ठी लिहून मुलीचे घरातून पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 18:24 IST2022-05-21T18:21:09+5:302022-05-21T18:24:55+5:30
१६ वर्षीय अल्पवयीन मुलगी, सर्व सदस्य घरात असताना मुलगी अचानकपणे दुपारच्या सुमारास घरातून गायब झाली.

‘मेरे सपने बडे है, उसे पुरा करने जा रही हूँ’, चिठ्ठी लिहून मुलीचे घरातून पलायन
वर्धा : घरातील बेडरुममध्ये चिठ्ठी लिहून मेरे सपने बडे है, मै उसे पुरा करने जा रही हूँ, असे लिहून १६ वर्षीय मुलीने पलायन केले. तिला कुणीतरी पळवून नेल्याची तक्रार घरच्यांनी शहर पोलिसात २० रोजी दाखल केली असून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.
१६ वर्षीय अल्पवयीन मुलगी, सर्व सदस्य घरात असताना मुलगी अचानकपणे दुपारच्या सुमारास घरातून गायब झाली. तिचा सर्वत्र शोध घेतला पण ती कुठेच मिळून आली नाही. तिच्या घरच्यांनी तिच्या खोलीची पाहणी केली असता चिठ्ठी लिहून असलेली दिसून आले.
घरच्यांनी चिठ्ठी वाचली असता त्यात मेरे सपने बडे है उसे पुरा करने जा रही हूँ, असा मजकूर लिहिलेला होता. त्यामुळे घाबरलेल्या घरातील सदस्यांनी थेट शहर पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून मुलीचा शोधार्थ पोलीस रवाना झाल्याची माहिती दिली.