पालिकेचा इशारा; थुकल्यास तुमच्यावर होईल कारवाई !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 17:27 IST2025-02-11T17:26:39+5:302025-02-11T17:27:20+5:30

नागरिकांनी नियमांचे पालन करावे : कारवाईची गती वाढवणे गरजेचे

Municipality warns; Action will be taken against you if you spit! | पालिकेचा इशारा; थुकल्यास तुमच्यावर होईल कारवाई !

Municipality warns; Action will be taken against you if you spit!

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर थुंकल्याने इतरांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. हे माहीत असतानाही अनेक जण पान, गुटखा खाऊन उघड्यावर पिचकारी मारून सार्वजनिक आरोग्यास बाधा निर्माण करीत आहेत. अशा लोकांवर नगर परिषदेकडून कारवाई केली जात आहे.


शासनाच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. यामध्ये उघड्यावर थुंकणे हा प्रकार गंभीर मानला जातो. याविरुद्ध पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जाते. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी शिस्त पाळणे आवश्यक आहे. शहरात ठिकठिकाणी उघड्यावर कचरा टाकणे, सार्वजनिक ठिकाणी भुंकणे, अस्वच्छता करणे आदींबाबत कठोर कायदे आहेत. शहरातील प्लॉटवर, व्यापारी संकुल, भाजी मार्केट, बसस्थानक आदी ठिकाणी उघड्यावर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण करतात. याविरुद्ध नगर परिषद प्रशासनाकडून कारवाई अपेक्षित आहे. 


वेळीच सावध व्हा, अन्यथा पालिका कारवाई करणार...

  • नागरिकांनी नियमांचे पालन करून सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर थुंकणे बंद करावे, तसेच शहराची स्वच्छता ठेवण्यास प्रशासनाला सहकार्य करावे.
  • १ हजार रुपये दंड सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास आकारला जातो, तसेच अस्वच्छता केल्यास १ रुपयाचा दंड पालिका प्रशासनाकडून आकारला जातो. मात्र, काही नागरिक या नियमाकडे डोळाझाक करून उद्यड्यावर घाण करीत असतात. अशा नागरिकांवर नगर परिषदेने वेळीच दंडात्मक कारवाई करने गरजेचे आहे.


१५ हजारांहून अधिक रुपयांचा दंड
सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, रस्त्यावर कचरा टाकणे, दुभाजकावर थुंकणे अशा नागरिकांकडून नगर परिष प्रशासनाने गेल्या एक वर्षात १५ हजारांहून अधिक रुपयांचा दंड वसूल केला आहे.


कारवाईची गती वाढवणे गरजेचे
शहरातील दुभाजकावर थुंकणे, त्यावर कचरा फेकणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नगर परिषदने कारवाईची गती वाढण्याची आवश्यकता आहे.


७० नागरिकांना दिल्या नोटीस
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, अस्वच्छता निर्माण करणे, अशा ७० नागरिकांना नोटीस दिल्या आहेत. वर्धा नगर परिषद प्रशासनाच्या पथकाकडून विविध ठिकाणी मोहीम राबविण्यात येते. त्यामध्ये कारवाई करीत दंड वसूल करण्यात येतो.


"नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी घाण करू नये, सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल."
- राजेश भगत, मुख्याधिकारी, न.प. वर्धा

Web Title: Municipality warns; Action will be taken against you if you spit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :wardha-acवर्धा