‘समृद्धी’वर पुन्हा अपघात; सावंगीतील डॉक्टर गंभीर तर आईचा जागीच मृत्यू
By चैतन्य जोशी | Updated: August 26, 2023 14:28 IST2023-08-26T14:25:42+5:302023-08-26T14:28:38+5:30
केळझर ते येळाकेळी दरम्यान अपघात : जखीवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरु

‘समृद्धी’वर पुन्हा अपघात; सावंगीतील डॉक्टर गंभीर तर आईचा जागीच मृत्यू
वर्धा : नागपूरकडून वर्ध्याकडे समृद्धी महामार्गाने जात असताना केळझर ते येळाकेळी दरम्यान कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुचाकीला धडकून अपघात झाला. या अपघातात उदयपूर येथील गीतांजली मेडिकल कॉलेजमध्ये विभाग प्रमुख असलेल्या डॉ. नूतन बेदी (६०) यांचा जागीच मृत्यू झाला तर सावंगी मेघे येथील रुग्णालयातील त्यांचा मुलगा डॉ. गौतम बेदी (२५) हे गंभीर जखमी झाले.
हा अपघात २५ रोजी रात्री नऊ वाजता झाला. प्राप्त माहितीनुसार, डॉ. गौतम बेदी हा त्याची आई डॉ. नूतन बेदी यांच्यासोबत कारने नागपूरवरुन समृद्धी महामार्गाने वर्ध्याकडे येत होते. गौतम बेदी यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्ता दुभाजकावर धडकली आणि रस्त्यावर तीन ते चार पलट्या खात उलटली. यात डॉ. नूतन बेदी यांचा जागीच मृत्यू झाला. तर डॉ. गौतम बेदी हे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिस केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक सुधाकर कुमरे, चंद्रकांत जीवतोडे, सुनील श्रीनाथे, प्रदीप डोंगरे हे चमूंसह दाखल झाले. महामार्गावरील रुग्णवाहिकेने जखमी गौतम बेदी यांना सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.