दूध विक्रेत्यास ठोठावला दंडासह सश्रम कारावास

By महेश सायखेडे | Published: October 16, 2023 09:21 PM2023-10-16T21:21:59+5:302023-10-16T21:22:17+5:30

पाचवीतील विद्यार्थिनीचा विनयभंग भोवला

Milk seller sentenced to rigorous imprisonment with fine in case of molestation | दूध विक्रेत्यास ठोठावला दंडासह सश्रम कारावास

दूध विक्रेत्यास ठोठावला दंडासह सश्रम कारावास

वर्धा: पाचवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीच्या घरात प्रवेश करून तिचा विनयभंग करणाऱ्या दूध विक्रेत्याला दंडासह सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. प्रतिक सतीश ठाकरे (रा. देवळी) असे शिक्षेस पात्र ठरलेल्या दूध विक्रेत्याचे नाव आहे. हा निकाल वर्धा येथील अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. टी. सूर्यवंशी यांनी दिला.

प्रतिक ठाकरे याला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ अन्वये एक वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याचा कारावास, भादंविच्या कलम ४५१ अन्वये एक वर्षांचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

आय लव्ह यू म्हणत दाखविले अश्लील फोटो
पीडित मुलगी घरी एकटी असताना आरोपी दूध वितरीत करण्यासाठी आला. त्याने पीडितेला दूध वितरित केल्यानंतर पीडिता हिने दूध असलेले पातेले गॅस सिलिंडरच्या ओट्यावर ठेवले. ती तिच्या पलंगावर बसली. दरम्यान, आरोपीने तिच्या घरात प्रवेश केला. तु मला खूप आवडतेस, आय लव्ह यू असे म्हणत आरोपीने पीडितेला मोबाइलमधील अश्लील फोटो दाखविले. अशातच पीडितेचे बाबा आले, असे ओरडताच आरोपीने तेथून पळ काढला. त्यानंतर पीडितेचे कुटुंबीय घरी परतल्यावर पीडितेने तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर देवळी पोलिस ठाण्यात तक्रारीवरून गुन्ह्याची नोेंद घेण्यात आली होती.

एसडीपीओंनी केला तपास
संबंधितप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर या प्रकरणाचा तपास पुलगावचे तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे यांनी करून प्रकरण न्याय प्रविष्ट केले. याप्रकरणी ॲड. विनय आर. घुडे यांनी न्यायालयात शासकीय बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून सुरुवातीला समीर कडवे, तर नंतर भारती कारंडे यांनी काम पाहिले.

आठ साक्षीदारांची तपासली साक्ष
याप्रकरणी आठ साक्षीदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, पुरावे व साक्षीदारांची साक्ष लक्षात घेऊन अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. टी. सूर्यवंशी यांनी आरोपीला शिक्षा ठोठावली.

Web Title: Milk seller sentenced to rigorous imprisonment with fine in case of molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :wardha-pcवर्धा