नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना घातला गंडा, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 17:57 IST2025-02-15T17:55:42+5:302025-02-15T17:57:26+5:30

Wardha : भाड्याच्या घरातून चालू होते फसवणूकीचे रँकेट

Many people were duped by promising jobs, two arrested | नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना घातला गंडा, दोघांना अटक

Many people were duped by promising jobs, two arrested

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
बंद भाड्याच्या पाच खोल्यांच्या घरातून बेरोजगार सुशिक्षीत युवकांना नोकरीचे आमिष देत फसवणूकीचे भारतभर रॅकेट चालविणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून १ लाख १९ हजारांचया रोख रकमेसह १ नोटपेंड, ८ मोबाईल, ३ लॅपटॉप, ३ एटीएम कार्ड असा २ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. कुमार मदनमुरारी सिंह (३३ रा. कुरथॉल, पटना), रोशनकुमार अखिलेशकुमार सिंह (३० रा. पटेल नगर, पटना, बिहार) अशी अटक केलेल्यांनी नावे आहे.


सुरज धनराज जोध रा. आष्टी यांना नोकरी डॉट कॉम या संकेतस्थळावर महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीमध्ये जी.टी. इंजीनिअर या पदाच्या जागा रिक्त जागेसाठी जाहिरात दिसली. यासाठी त्यांनी ऑनलाईन अप्लाय केला. कंपनीकडून बोलत असल्याचे सांगून वेगवेगळ्या कारणास्तव १ लाख ३८ हजार ४५० रुपये भरायला सांगितले. मात्र पैसे भरूनही नोकरी न लागल्याने सायबर पोलिसात तक्रार दिली होती.


वाराणसीतून केली अटक
आरोपींचा तांत्रीक पद्धतीने तपास केला असता आरोपी हे बिहार राज्यातील असून सद्या वाराणसी, उत्तर प्रदेश येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या शोधात पोलिसांचे एक सदर पथक रवाना केले होते. ४ दिवस आरोपीतांची माहिती घेत छापा घातला. असता कुमार मदनमुरारी सिंह, रोशनकुमार अखिलेशकुमार सिंह यांना शांतीनगर कॉलोनी वाराणासी, उप्र) येथून लोकांची फसवणूक करत असताना रंगेहात अटक केली.


इतर राज्यातील फसवणुकीचे गुन्हे उघड
आरोपी ५ खोल्यांच्या घरातून भारतभर फसवणुकीचे गुन्हे करत होते. त्याच्या ताब्यातून नोटपँड, मोबाईल, लॅपटॉप, रोख रकमेसह २ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत गुन्हा उघडकीस आणला. आरोपीतांकडून महाराष्ट्रासह इतर राज्यातील गुन्हे उघड झाले असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते, निलेश तेलरांधे, दिनेश बोथकर, वैभव कट्टोजवार, अमित शुक्ला, अनुप कावळे, रंजीत जाधव, अनुप राऊत, प्रतिक वांदीले, पवन झाडे, लेखा राठोड, आरती पारीसे यांनी केली. 

Web Title: Many people were duped by promising jobs, two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.