स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने वार; पत्नीसही केले जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2022 11:17 IST2022-11-03T11:15:31+5:302022-11-03T11:17:43+5:30

आमगाव येथील घटनेने खळबळ

man stabbed his own neck with a blade and also injured his wife | स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने वार; पत्नीसही केले जखमी

स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने वार; पत्नीसही केले जखमी

वर्धा : मनोरुग्ण पतीने स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने वार करीत पत्नीच्या गळ्यावरही ब्लेडने वार करून जखमी केले. ही घटना आमगाव येथे घडली. याप्रकरणी १ रोजी सिंदी रेल्वे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. मनोज फागुजी चिडाम असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर पत्नी संगीता चिडाम हिच्यावर उपचार करून तिला रुग्णालयातून सुटी मिळाल्याची माहिती आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मनोज चिडाम याची मागील एक महिन्यापासून प्रकृती बिघडली आहे. तो मनोरुग्णासारखा वागत असल्याने काहीही बडबड करीत असतो. मनोजने ब्लेडने स्वत:च्या गळ्यावर वार केले. ही बाब त्याची पत्नी संगीताला दिसताच ती ओरडली असता, मनोजने तिच्याही गळ्यावर ब्लेडने वार केले. दोघांनाही सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. संगीतावर उपचार करून तिला सुटी देण्यात आली. पण, मनोजची प्रकृती नाजूक असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी सिंदी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

Web Title: man stabbed his own neck with a blade and also injured his wife