लघु उद्योगासाठी कर्ज ; सव्वादोन हजार प्रस्ताव, मंजुरी केवळ दीडशे प्रस्तावांनाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 17:09 IST2025-01-29T17:06:40+5:302025-01-29T17:09:08+5:30

Wardha : जिल्ह्यात सर्वाधिक प्रस्ताव अन्नप्रक्रिया उद्योगासाठी

Loans for small businesses; Two and a half thousand proposals, approval for only 150 proposals | लघु उद्योगासाठी कर्ज ; सव्वादोन हजार प्रस्ताव, मंजुरी केवळ दीडशे प्रस्तावांनाच

Loans for small businesses; Two and a half thousand proposals, approval for only 150 proposals

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
सूक्ष्म उद्योग आणि व्यवसायासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते. मागील वर्षभरात २ हजार २२२ कर्जाचे प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राकडे आले होते. त्यापैकी १६१ प्रस्तावांना बँकेकडून कर्ज मंजूर करण्यात आले. परंतु बँकेकडे ६७० प्रस्ताव पेंडिंग आहेत.


सूक्ष्म उद्योग व व्यवसाय करण्यासाठी अनेकांकडे भांडवल नसते. भांडवल उभारण्यासाठी संबंधितांना कर्ज काढावे लागते. परंतु बँकेकडून हे कर्ज सहजासहजी उपलब्ध होत नाही. बँकेकडून विविध कागदपत्रांची मागणी केली जाते. तसेच अटी, शर्त लावल्या जातात. या अटींची पूर्तता न करणाऱ्या अर्जदाराला योजनेचा लाभ दिला जात नाही. शासनाकडून लघु उद्योगाला चालना देण्यासाठी विवध योजना राबविल्या जाते. यासाठी अनेकांनी बँकांकडे अर्ज केले. मात्र, बँकांची उदासीनता या लघुउद्योगांसाठी बाधा ठरत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.


जिल्ह्यात सर्वाधिक प्रस्ताव अन्नप्रक्रिया उद्योगासाठी
शासकीय योजनेतून अडीच लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. स्वयंरोगारातून आर्थिक घड़ी सुधारावी यासाठी जिल्हा भरातून जिल्हा उद्योग केंद्राकडे २ हजार २२२ प्रस्तावा प्राप्त झाले. यापैकी अधिकाधिक प्रस्ताव हे मिल्क प्रोडक्टस, अन्नप्रक्रिया उद्योग, इलेक्ट्रॉनिक, रेडिमेड गारमेंटस, फॅशन डिजायनिंग, ब्युटीपार्लर, डिजिटल प्रिंटिंग आदीसाठी आले. मात्र यापैकी नाममात्रच प्रस्तांवाना मंजुरी मिळाल्याने लघुउद्योगाचे अनेकांचे स्वप्न भंगले असल्याचे दिसून येत आहे.


सूक्ष्म उद्योग व व्यवसाय योजनेतू दिला जातो लाभ
सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांसाठी भारत सरकारच्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने कर्ज योजना सुरू केली आहे. उद्योगांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा सदर योजनेचा उद्देश आहे.


कसा कराल प्रस्ताव सादर?

  • उत्पादन व सेवा उद्योगासाठी कर्ज हवे असल्यास संबंधितांनी ऑनलाइन १ पद्धतीने अर्ज भरून त्याचा प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राकडे सादर करावा लागणार आहे.
  • वर्धा जिल्ह्यातील उमेदवारांनी 3 ऑनलाइन कर्जाचा प्रस्ताव भरून कारला चौक येथील जिल्हा उद्योग केंद्रामध्ये सादर करावा लागणार आहे.


२२२२ प्रस्ताव जिल्ह्यातून डीआयसीकडे दाखल
सूक्ष्म उद्योग व व्यवसायासाठी २ हजार २२२ अर्ज डीआयसीकडे दाखल झाले. मात्र वर्षभरात केवळ १६१ प्रस्तावांनाच बँकेनकडून मंजुरी मिळाली असल्याचे सांगण्यात आले.


"सुशिक्षितांना उद्योगासाठी कर्ज हवे असेल तर अशांनी पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने कर्जाचा प्रस्ताव भरुन घ्यावा. पात्र उमेदवारांना बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. सरकारच्या या योजनेचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ द्यावा."
- सुनील हजारे, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, वर्धा

Web Title: Loans for small businesses; Two and a half thousand proposals, approval for only 150 proposals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.