महामार्गाच्या कामासाठी अवैध उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:00 IST2019-10-15T05:00:00+5:302019-10-15T05:00:43+5:30
महामार्गाच्या कामासाठी अल्लीपूरपासून ५ कि.मी. अंतरावर धोत्रा गावाजवळ शेतकऱ्यांच्या शेतातील मुरूम व माती मोठ्या प्रमाणावर खोदून नेण्यात येत आहे. शेतकऱ्यांची कुठलीही परवानगी न घेता त्रिनेवा इन्फ्रा प्रायव्हेट लिमीटेड कंपनीने १० फुट खोल खड्डे करून खोदकाम करून माती व मुरूम रस्ता कामासाठी वापरला आहे. हिंगणघाट-वर्धा रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात येत आहे.

महामार्गाच्या कामासाठी अवैध उत्खनन
लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपूर/वर्धा : समृध्दी महामार्गात अॅपकॉन कंपनीने मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या मुरूम, माती चोरून नेल्याचे प्रकरण उघडकीस आले असताना असाच प्रकार पुन्हा त्रिनेवा इन्फ्रा प्रायव्हेट लिमीटेड कंपनीच्या माध्यमातून अल्लीपूर परिसरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. हिंगणघाट- वर्धा या महामार्गाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे.
या महामार्गाच्या कामासाठी अल्लीपूरपासून ५ कि.मी. अंतरावर धोत्रा गावाजवळ शेतकऱ्यांच्या शेतातील मुरूम व माती मोठ्या प्रमाणावर खोदून नेण्यात येत आहे. शेतकऱ्यांची कुठलीही परवानगी न घेता त्रिनेवा इन्फ्रा प्रायव्हेट लिमीटेड कंपनीने १० फुट खोल खड्डे करून खोदकाम करून माती व मुरूम रस्ता कामासाठी वापरला आहे. हिंगणघाट-वर्धा रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात येत आहे.
कंपनीकडून करण्यात आलेल्या या खोदकामामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. स्थानिक प्रशासन या बाबीकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. महसूल प्रशासनाकडे या संदर्भात तक्रारी करण्यात आल्या, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. अनेक भागात मुरूम व माती काढण्यात आल्यामुळे मोठे खड्डे पडले असून शेकडो ट्रकच्या सहाय्याने मुरूम, मातीची वाहतुक केली जात आहे.
मुरूम, माती काढल्याने येथे खड्डे निर्माण झाले.त्या खड्ड्यात पावसाचे पाणी जमा होवून तेथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कंपनीच्या शेकडो वाहनामुळे रस्त्याची पुरती वाट लागली आहे. मात्र कंपनीच्या या सर्व कारभाराला प्रशासनाचा आर्शिवाद असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.
यापूर्वी जिल्ह्यात सेलू तालुक्यात अॅपकॉन कंपनीने अशाच प्रकारे मुरूम, माती अवैधरित्या चोरून नेली होती. याप्रकरणी सेलू पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर संबंधीत कंपनीच्या अधिकाºयाचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावला आहे.
अल्लीपूर भागातील या प्रकरणातही असाच प्रकार झाल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकºयांची परवानगी न घेताच त्यांचे शेत, परिसरातील रस्त्यालगतची जागा खोदली जात आहे.
वर्धा - हिंगणघाट महामार्गाच्या कामात कंत्राटदार कंपनीकडून अवैधरित्या शेतकºयांच्या शेतातील मुरूम, माती काढून नेल्याच्या प्रकरणात अद्याप एकही तक्रार प्रशासनाकडे आलेली नाही. शेतकºयांची तक्रार आल्यास चौकशी करून कारवाई केली जाईल.
- प्रीती डुडुलकर, तहसीलदार वर्धा.