शेतकऱ्यांना स्मार्टफोनच्या माध्यमातून नोंदवता येणार पीक पेरा; शेतकऱ्यांनी केलेली नोंदणी धरली जाणार ग्राह्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 17:38 IST2024-12-14T17:35:59+5:302024-12-14T17:38:06+5:30

Wardha : ॲपमध्ये केलाय बदल १५ जानेवारीपर्यंत नोंदविता येणार रब्बीतील पिकांचे क्षेत्र

Farmers will be able to register crop sowing through smartphones; Registration made by farmers will be accepted | शेतकऱ्यांना स्मार्टफोनच्या माध्यमातून नोंदवता येणार पीक पेरा; शेतकऱ्यांनी केलेली नोंदणी धरली जाणार ग्राह्य

Farmers will be able to register crop sowing through smartphones; Registration made by farmers will be accepted

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा :
राज्य शासनाने खरीप हंगामापाठोपाठ रब्बी हंगामातही पीक पेऱ्याची ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना स्वतः शेतात जाऊन स्मार्टफोनच्या माध्यमातून पीक पेरा नोंदवायचा आहे.


यासाठी १ डिसेंबर ते १५ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दीड महिन्यांमध्ये रब्बी हंगामात पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या पिकांची नोंदणी करता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना हमी केंद्रावर पिकांची विक्री करताना ऑनलाइन झालेली नोंदणीच ग्राह्य धरली जाणार आहे. याशिवाय अवकाळी पाऊस आला, गारपीट झाली अथवा इतर नुकसान झाले तर ऑनलाइन पद्धतीने नोंदविले गेलेले क्षेत्र ग्राह्य धरले जाणार आहे. पूर्वी तलाठ्यांकडून पीक पेन्ऱ्यांची नोंदणी होत होती.


तलाठ्यांनी केलेली नोंद अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडली. यामुळे राज्य शासनाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांनाच पीकपेरा नोंदविण्यासाठी संमती दिली आहे. ही नोंदणी ग्राह्य धरली जाणार आहे. यानुसारच शेतकऱ्यांना मदतही दिली जाते. त्यामुळे आता शेतकऱ्यांनाही अपडेट व्हावे लागेल. 


तर मिळणार नाही नुकसान भरपाई ऑनलाइन पीक पेरा नोंदविला नसल्यास नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना मदत न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे पौक पेरा नोंदविणे गरजेचे आहे.


५० मीटरवरूनही काढता येणार फोटो 
पूर्वीच्या ॲपमध्ये शेतामध्ये असतानाही आपण २०० मीटरपेक्षा दूर आहात असा मेसेज येत होता. यात सुधारणा आल्याने शेतातील ५० मीटर अंतरावरील फोटो घेता येणार आहे.


बांधावरची झाडेही नोंदवता येणार 

  • पूर्वीच्या सॉफ्टवेअरमध्ये धुऱ्यावरील असलेले झाडे नोंदविली जात नव्हती, अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतशिवारात धुयावर वृक्ष लावले आहेत. याची नोंद आता घेतली जाणार आहे.
  • यामुळे नैसर्गिक आपत्ती काळात फळझाडांचे नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना त्याची मदत मिळणार आहे. बांधावरील झाडे नोंदविली गेल्याने शेतामध्ये वृक्ष लागवडीचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.


नोंदणी अत्यंत आवश्यक
"शेतीच्या विविध योजना राबविताना अद्ययावत प्रणालीचा वापर होत आहे. रब्बीची पेरणी झाल्यानंतर आता शेतकऱ्यांनी शेतशिवारात ऑनलाइन पद्धतीने पीक पेऱ्याची नोंदणी करणे आवश्यक आहे. खरिपाप्रमाणे रब्बीतही अशी नोंदणी करून आपले पीक शासन दरबारी नोंदविता येणार आहे. ही नोंद नुकसानीच्यावेळी ग्राह्य असेल."  
- संदीप पुंडेकर, तहसीलदार, वर्धा

Web Title: Farmers will be able to register crop sowing through smartphones; Registration made by farmers will be accepted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.