‘गर्लफ्रेंड’सोबत ‘डान्स’ केल्याने प्रियकराचा राग झाला अनावर अन्..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2022 11:42 IST2022-12-07T11:33:11+5:302022-12-07T11:42:06+5:30

उमरी मेघे येथील घटना

enraged boyfriend beat up and stabs girlfriend's friend for dancing with her | ‘गर्लफ्रेंड’सोबत ‘डान्स’ केल्याने प्रियकराचा राग झाला अनावर अन्..

‘गर्लफ्रेंड’सोबत ‘डान्स’ केल्याने प्रियकराचा राग झाला अनावर अन्..

वर्धा : पार्टीत ‘गर्लफ्रेंड’सोबत ‘डान्स’ केल्याने संतापलेल्या प्रियकराला राग अनावर झाला अन् रागाच्या भरात प्रियकराने ‘प्रेयसी’च्या मित्राला लाथाबुक्क्यांनी तसेच चाकूने मारहाण करुन जखमी केले. ही घटना उमरी मेघे गावात घडली. याप्रकरणी सावंगी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांकडून आरोपींवर लवकरच अटकेची कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी दिली.

रुपम नामक युवक हा उमरी गावात असताना आरोपी आकाश भोयर रा. मास्टर कॉलनी आणि चिंदू नामक युवक हे दोघेही त्याच्याजवळ आले. दरम्यान आकाशने रुपमला माझ्या ‘गर्लफ्रेंड’सोबत पार्टीत डान्स का केला, असे म्हणत शाब्दिक वाद करु लागला.

रुपमने हटकले असता आकाश व चिंदू या दोघांनी आकाशच्या पाठीवर दगडाने मारहाण केली. तसेच चाकूने उजव्या हाताच्या बोटावर मारून जखमी केले. याप्रकरणी रुपमने सावंगी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून लवकरच अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सावंगी पोलिसांनी दिली.

Web Title: enraged boyfriend beat up and stabs girlfriend's friend for dancing with her