सिमेंट पोल भरलेला ट्रक्टर दुभाजकावर चढून पलटी; चालक ठार, दुसरा गंभीर जखमी

By अभिनय खोपडे | Updated: April 7, 2023 17:27 IST2023-04-07T17:23:42+5:302023-04-07T17:27:46+5:30

अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूने 5 ते 6 किमीपर्यंत वाहनांची रांग

Driver killed, another seriously injured after a tractor loaded with cement poles overturned on the divider | सिमेंट पोल भरलेला ट्रक्टर दुभाजकावर चढून पलटी; चालक ठार, दुसरा गंभीर जखमी

सिमेंट पोल भरलेला ट्रक्टर दुभाजकावर चढून पलटी; चालक ठार, दुसरा गंभीर जखमी

वर्धा (समुद्रपुर) :  तालुक्यातील शेडगाव पाटी जवळील सिमेंट पोल भरलेला ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन दुभाजकावर चढून पलटी झाला. या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेला दुसऱ्या व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. मृतकाचे नाव कुणाल बावणे (रा. मांडगाव) असे आहे.

प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी ७ एप्रिलला परिसरातील मा़डगांव येथील अंकित दांडेकर यांच्या मालकीचा ट्रॅक्टर (एम एच ३२ सि.ए.७९३७) हा चालक कुणाल नानाजी बावणे व सोबत एका व्यक्तीसह ट्रक्टरमध्ये इलेक्ट्रिक सिमेंट पोल घेऊन खंडाळ्याला जात होते. दरम्यान, शेडगाव टाकीजवळ अचानक चालकाचे वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन दुभाजकावर चढले त्यामध्ये ट्रॅक्टर पलटी झाला.

या अपघातात ट्रेकटर चालक कुणाल नानाजी बावणे  (२५) वर्ष रा. मांडगाव याचा जागीच मृत्यू तर एक जण जखमी झाला. जखमीला उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे दोन्ही बाजूने 5 ते 6 किमी वाहनांच्या रांगा लागल्याने दोन्ही कडील वाहतूक दोन तास खोळंबली होती. यावेळी महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राचे प्रभारी सपाटे यांनी व सहकाऱ्यांनी वाहतूक खुली केली. सदर घटनेची समुद्रपुर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असुन पुढील तपास समुद्रपुर पोलीस करीत आहे.

Web Title: Driver killed, another seriously injured after a tractor loaded with cement poles overturned on the divider

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.