आठ दिवसांपूर्वी बांधलेल्या रस्त्याला पडल्या भेगा, महामार्गाच्या बांधकामाची सखोल चौकशी करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 17:08 IST2025-01-09T17:07:13+5:302025-01-09T17:08:46+5:30
बांधकाम विभागाला निवेदन: शरद पवार गटाची मागणी

Cracks appear on road built eight days ago, demand for thorough investigation into highway construction
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : राष्ट्रीय महामार्ग ३२२ हिंगणघाट ते नंदोरी हायवेवर आठ दिवसात बांधलेल्या रस्त्याला भेगा पडल्यामुळे बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शरद पवार गट राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांना निवेदन दिले.
हिंगणघाट-नंदोरी महामार्गाचे काम सहा महिन्यांपासून सुरू आहे. हे बांधकाम नुकतेच सुरू झाले असून बांधकाम झालेल्या हायवेला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण या हायवेवर वाढले आहे. १५ दिवस आधी याच रोड वरती अशोक बोरकर यांचा अपघात होऊन मृत्यू देखील झाला आहे. परिसरात राहणाऱ्या नागरिकांना या रोडच्या मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या रोडचा नुकत्याच झालेल्या कामाला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहे. त्यामुळे या रोडच्या कामांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. नंदोरी रोडच्या आजूबाजूला अनेक वर्षांपासून झाडे लावण्यात आली होती. परंतु रोडच्या कामामुळे त्या झाडाची तोडली आहे. त्यामुळे झाडे तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच शहरातील मोठा दळणवळीचा मार्ग फिदा हुसेन पेट्रोल पंप ते विठोबा चौक पर्यंत रोडचे नुकतेच एक वर्षा आधी बांधकाम झाले असून या रस्त्याला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहे. रोडच्या मधोमध गट्ठ लावण्यात आले आहे. ते गद्व देखील निघत आहे. या सर्व कामाची चौकशी करून कारवाई करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांना निवेदन दिले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे शहाराध्यक्ष बालू वानखेडे, समाजसेवक सुनील डोंगरे, विधानसभा बूथ अध्यक्ष अमोल बोरकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, सुनील भुते, पंकज भट्ट, आकाश हुरर्ले, निखिल ठाकरे आदी उपस्थित होते.
झाडे तोडणाऱ्यावर कारवाई करावी...
नांदोरी रोडच्या आजुबाजूला झाडे लावण्यात आले होते. त्या झाडाचे संगोपन करण्यात येत होते. परंतु सडक बांधकाम करते वेळी ही झाले तोडण्यात आली. त्यामुळे झाडे तोडणाऱ्यावर कारवाई करावी आशी मागणी यावेळी शिष्टमंडळानी केली.