वर्ध्यात कार-दुचाकीत चोरदार धडक; अपघातात एक ठार, दोघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2022 12:10 IST2022-08-08T12:07:52+5:302022-08-08T12:10:09+5:30

अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना अमरावती येथील रुग्णालयाकडे रवाना केले.

Car-bike collision in Wardha; One killed, two seriously injured | वर्ध्यात कार-दुचाकीत चोरदार धडक; अपघातात एक ठार, दोघे गंभीर जखमी

वर्ध्यात कार-दुचाकीत चोरदार धडक; अपघातात एक ठार, दोघे गंभीर जखमी

आर्वी (वर्धा) : कार-दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास झाला.

अमरावतीकडून एम. एच. १२ क्यू. एफ. ५१११ क्रमांकाची कार येत होती. तर एम. एच. २७ बी. एन. ४८०५ क्रमांकाची दुचाकी विरुद्ध दिशेने येत होती. याच दोन वाहनात जबर धडक झाली. यात मिथुन शीरशीया याचा जागीच मृत्यू झाला तर जितू धामणे व जय निंदाने हे गंभीर जखमी झाले.

अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना अमरावती येथील रुग्णालयाकडे रवाना केले. भरधाव कारचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत असून या अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली आहे. या अपघातात दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील तपास आर्वीचे ठाणेदार भानुदास पिदूरकर करीत आहेत.

Web Title: Car-bike collision in Wardha; One killed, two seriously injured