‘समृद्धी’वर कारचा अपघात; चार गंभीर जखमी
By चैतन्य जोशी | Updated: April 19, 2023 14:33 IST2023-04-19T14:32:22+5:302023-04-19T14:33:41+5:30
सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरु : जाम पोलिस अपघातस्थळी दाखल

‘समृद्धी’वर कारचा अपघात; चार गंभीर जखमी
वर्धा :समृद्धी महामार्गावरुन वाशिमकडे जाणारी कार अनियंत्रीत होऊन थेट रस्ता दुभाजकालगतच्या नालीत जाऊन कोसळली. या अपघातात कारमधील तीन महिलांसह चालक गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी १८ रोजी सायंकाळच्या सुमारास येळाकेळी इंटरचेंजपासून पाच कि.मी. अंतरावर झाला. जाम महामार्ग पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात पाठविले. सरिता जयस्वाल, सविता जयस्वाल, लीला जयस्वाल आणि चालक इम्रान खान सर्व रा. वाशिम असे जखमीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, एम.एच. ३७ व्ही. १७५७ क्रमांकाची कार इम्रान खान चालवित होता. तीन महिलांना घेऊन तो नागपूर येथून वाशिमकडे हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरुन जात होता. येळाकेळी येथील इंटरचेंज पास करुन काही दूर अंतरावर गेल्यानंतर चालक इम्रान खान याला डुलकी आल्याने स्टेअरिंगवरुन त्याचे नियंत्रण सुटले अन् कार अनियंत्रीत झाली.
दरम्यान कार रस्ता सोडू थेट रस्ता दुभाजकाच्या मधातील नालीत जाऊन कोसळली.या अपघातात कार क्षतीग्रस्त झाली असून कारचालकासह कारमधील तीन महिला गंभीर जखमी झाल्या. अपघातस्थळी तत्काळ रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. रुग्णवाहिकेतील डॉकटरांच्या चमूने प्राथमिक उपचार करुन सर्व जखमींना सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारार्थ पाठविले. या अपघातस्थळी जाम महामार्ग पोलिसही दाखल झाले होते.