'लाज वाटत नाही का?' प्लास्टिकच्या पिशवीवरून अजित पवारांचा कार्यकर्त्यांना झणझणीत दम!

By शुभांगी काळमेघ | Updated: August 22, 2025 13:30 IST2025-08-22T13:27:10+5:302025-08-22T13:30:29+5:30

Wardha : स्वच्छतेसाठी अजित पवार मैदानात उतरले, व्हिडीओने सोशल मीडियावर केली धूम

'Aren't you ashamed?' Ajit Pawar's scolds workers over plastic bags! | 'लाज वाटत नाही का?' प्लास्टिकच्या पिशवीवरून अजित पवारांचा कार्यकर्त्यांना झणझणीत दम!

'Aren't you ashamed?' Ajit Pawar's scolds workers over plastic bags!

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर्धा दौऱ्यात कार्यकर्त्याने स्वागतासाठी आणलेला गुलदस्ता दिल्यानंतर प्लास्टिकची पिशवी जमिनीवर फेकली आणि अजित पवारांनी लगेचच ती उचलत कार्यकर्त्यांना फटकारलं. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून, संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.


गुरुवारी (२१ ऑगस्ट) अजित पवार वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांचे स्वागत करताना एका कार्यकर्त्याने त्यांना गुलदस्ता दिला. मात्र, त्यानंतर त्या पुष्पगुच्छाची प्लास्टिक पिशवी जमिनीवर फेकली गेली. हे पाहून अजित पवार लगेच पुढे सरसावले, स्वतः ती पिशवी उचलली आणि तिथल्या कार्यकर्त्यांना रागाने सुनावलं.


"तुम्हाला लाज वाटत नाही का रे? किती वेळा सांगतो, पिशव्या खाली टाकू नका. लोक शिव्या देतात तुम्हाला," असे म्हणत त्यांनी स्वच्छतेच्या मुद्द्यावर कार्यकर्त्यांची खरडपट्टी काढली.


या घटनेनंतर अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हलक्याफुलक्या शब्दांत वातावरण पुन्हा प्रसन्न केलं. एक कार्यकर्ता जोरात ओरडला, "दादा, आय लव्ह यू!" यावर अजित पवारांनीही हसून उत्तर दिलं, "आय लव्ह यू टू!"

Web Title: 'Aren't you ashamed?' Ajit Pawar's scolds workers over plastic bags!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.