गिमा टेक्टाईल कंपनीतील कामगाराचा अपघाती मृत्यू
By अभिनय खोपडे | Updated: September 9, 2022 14:58 IST2022-09-09T14:57:02+5:302022-09-09T14:58:24+5:30
वडनेर येथील सुनील परमेश्वर भगत (४५) यांचा दारोडा येथील पुलाजवळ दुचाकी अनियंत्रित होऊन रोडच्या लगत असलेल्या लोखंडी राॅडला धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला.

गिमा टेक्टाईल कंपनीतील कामगाराचा अपघाती मृत्यू
वर्धा : हिंगणघाट नजीकच्या गिमाटेस्टटाईल कंपनीतील कामगाराचा शुक्रवारी सकाळी ९:४० वाजता अपघाती मृत्यू झाला. वडनेर येथील सुनील परमेश्वर भगत (४५) यांचा दारोडा येथील पुलाजवळ दुचाकी अनियंत्रित होऊन रोडच्या लगत असलेल्या लोखंडी राॅडला धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला.
मृतक सुनील परमेश्वर भगत हा जवळच्या गिमा टेक्सटाईल कंपनीत काम करतो व रात्री नाईट ड्युटी झाल्यामुळे आज सकाळी तो आपल्या वडनेर या गावी निघाला होता कंपनीतून आपल्या गावाकडे वडनेर येथे जात असताना दारोडा जवळ त्याचे स्वतःची मालकीची टू व्हीलर एम एच 32 डब्ल्यू ७३९४ ही अनियंत्रित होऊन रोड लगत लागलेल्या लोखंडी राॅडला इसमाचे डोके लागले व त्याला जबर दुखापत झाली त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याचे वडनेर पोलीस स्टेशन सूत्रांकडून सांगण्यात आले या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सोनपितरे व पोलीस कॉन्स्टेबल अतुल लभाने करीत आहे.