संतापजनक! शाळेसमोरुन अपहरण, धावत्या गाडीत बालिकेवर अत्याचार; पुलगावातील घटनेने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2022 10:23 IST2022-08-23T17:31:55+5:302022-08-24T10:23:13+5:30
चाकूचा धाक दाखवून बसविले वाहनात

संतापजनक! शाळेसमोरुन अपहरण, धावत्या गाडीत बालिकेवर अत्याचार; पुलगावातील घटनेने खळबळ
चैतन्य जोशी
वर्धा : शाळेत जात असतानाच दोन नराधमांनी एका बालिकेचे चाकूचा धाक दाखवून अपहरण करीत कारमध्ये बसवून धावत्या गाडीत लैंगिक अत्याचार केला. ही घटना पुलगाव शहरात घडली. या घटनेने एकच खळबळ उडली असून समजमन सुन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी २२ रोजी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.
पीडिता ही नेहमीप्रमाणे घरुन शाळेत जाण्यासाठी निघाली. शाळेत जात असतानाच तिला सुमेध नामक युवक आणि एका अनोळखी युवकाने आवाज दिला. पीडिता ही शाळे समोरील प्रवेशद्वाराजवळ थांबली असता आरोपी नराधम सुमेध याने चाकूचा धाक दाखवून तिला चारचाकी वाहनात जबरदस्ती खेचत नेत बसवले. व अनोळखी युवकाने चारचाकी समोर नेली. यावेळी पीडितेने आरडाओरड केली. पण, कारच्या काचा बंद होत्या.
नराधम सुमेधने पीडितेवर धावत्या कारमध्येच बळजबरी अत्याचार केला. तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, पीडितेने सर्व आपबिती तिच्या घरच्यांना सांगितली. घरच्यांनी थेट पुलगाव पोलीस ठाणे गाठले. पीडितेच्या आईने सुमेध आणि त्याच्या एका मित्राविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.