सफाई कामगाराचा भूगावच्या कंपनीतील कार्यालयातच फॅनला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 20:21 IST2025-07-15T20:19:34+5:302025-07-15T20:21:05+5:30

इवोनीथ कंपनीतील घटना : सावंगी पोलिसांनी घेतली नोंद मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्टच.

A sanitation worker hanged himself to death in his company's office in Bhugaon. | सफाई कामगाराचा भूगावच्या कंपनीतील कार्यालयातच फॅनला गळफास

A sanitation worker hanged himself to death in his company's office in Bhugaon.

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
भूगाव येथील इवोनीथ कंपनीतील टेलिफोन ऑफिसमध्ये सफाई कामगाराने १४ रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास सिलिंग फॅनला दोराने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने कंपनी प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. सावंगी पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला.


मारोतराव बाळकृष्ण भोयर (४७ रा. सेलू काटे) असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. मारोतराव हे मागील १० वर्षापासून इवोनीथ कंपनीतील रेस्ट हाऊसमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होते. १३ रोजी त्यांची दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत कामाची वेळ होती. त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच १४ रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास टेलिफोन ऑफिसच्या कार्यालयात असलेल्या सिलिंग फॅनला दोर बांधून आत्महत्या केली. या घटनेने कंपनीत एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. 


सावंगी पोलिसांकडून पंचनामा
इवोनीथ कंपनीत सकाळीच आत्महत्येची घटना उजेडात आल्यानंतर सावंगी पोलिसांच्या पथकाने भूगाव येथील कंपनीत धाव घेतली. कंपनीच्या आत घटना घडल्याने कुणालाही आत जाण्याची परवानगी नव्हती. पोलिसांच्या पथकाने कार्यवाही करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवत घटनास्थळाचा पंचानामा केला.


कर्जाला कंटाळून आत्महत्येचा संशय
मारोतराव यांच्यावर खासगी कर्ज असल्याने ते चिंतेत राहत होते. अखेर त्यांनी याच विवंचनेतून हताश होत कंपनीतील टेलिफोन कार्यालयात गळफास घेत आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. मात्र, वृत्त लिहिस्तोवर आत्महत्येचे नेमके कारण काय, हे कळले नाही.
 

Web Title: A sanitation worker hanged himself to death in his company's office in Bhugaon.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :wardha-acवर्धा