मोठा अनर्थ टळला! मालगाडीच्या दोन बोगी रुळावरुन घसरल्या; वर्धा स्थानकावरील घटना

By आनंद इंगोले | Updated: June 16, 2023 20:09 IST2023-06-16T20:09:43+5:302023-06-16T20:09:59+5:30

चंद्रपूर येथून सिमेंट घेऊन जाणाऱ्या मालगाडीच्या अचानक दोन बोगी रुळावरुन घसरल्या.

A major disaster averted Two carriages of a freight train derailed Incident at Wardha station | मोठा अनर्थ टळला! मालगाडीच्या दोन बोगी रुळावरुन घसरल्या; वर्धा स्थानकावरील घटना

मोठा अनर्थ टळला! मालगाडीच्या दोन बोगी रुळावरुन घसरल्या; वर्धा स्थानकावरील घटना

वर्धा: चंद्रपूर येथून सिमेंट घेऊन जाणाऱ्या मालगाडीच्या अचानक दोन बोगी रुळावरुन घसरल्या. ही मालगाडी वर्धारेल्वेस्थानकावर पोहोचताच ही घटना घडल्याने घसरलेल्या बोगी सुमारे २०० फूट सिमेंटच्या स्लिपरवरुन घसरत गेले. त्यामुळे स्लिपरचे नुकसान झाले असून मालगाडी थांबल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ही घटना दुपारी साडेचार वाजतादरम्यान घडली. माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार ५८ बोगी असलेली मालगाडी सिमेंटच्या गोण्या घेऊन चंद्रपूर येथून जळगावला जात होती. ही मालगाडी साडेचार वाजतादरम्यान वर्धा रेल्वेस्थानकाच्या मालधक्क्यावर पोहोचली. नवीन फुटब्रिजजवळ इंजिन पोहोचल्यानंतर अचानक दोन बोग्यांची चाके रुळावरुन घसरली. त्याच अवस्थेत मालगाडी पुढे सरकत होती. मालगाडीची रुळावरून घसरलेली चाके जवळपास २०० फूट पुढे जात होती. तेव्हा ही बाब लक्षात येताच धावपळ उडाली. तेवढ्यात ही मालगाडी थांबल्याने पुढील अनर्थ टळला. पॉवर इंजिनमधील बोगी क्रमांक १३ आणि ३१ याच घसरल्या असून मालगाडीच्या एका बोगीत १ हजार सिमेंटच्या गोण्या असतात. या मालगाडीच्या २९ बोग्या नांदगाव आणि २९ बोग्या जळगाव येथे खाली करायच्या होत्या. मालगाडी रुळावरुन घसरल्याची माहिती मिळताच वर्धा स्थानकाचे बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. ही मालगाडी मालधक्का फलाटावर असल्याने कोणत्याही रेल्वेगाड्या प्रभावित झाल्या नाही.

Web Title: A major disaster averted Two carriages of a freight train derailed Incident at Wardha station