वर्ध्यातील आष्टी तालुक्यात २६ बोगस डॉक्टर ! मुळव्याधीच्या शस्त्रक्रिया अयशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 18:51 IST2025-06-06T18:49:58+5:302025-06-06T18:51:07+5:30

Wardha : बनावट पदव्या आणि डिप्लोमांचा आधार घेत आष्टी तालुक्यात बोगस डॉक्टर करतात 'प्रॅक्टिस'

26 bogus doctors in Ashti taluka of Wardhya! Piles surgeries failed | वर्ध्यातील आष्टी तालुक्यात २६ बोगस डॉक्टर ! मुळव्याधीच्या शस्त्रक्रिया अयशस्वी

26 bogus doctors in Ashti taluka of Wardhya! Piles surgeries failed

अमोल सोटे 
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) :
रुग्णसेवा हीच देशसेवा असे बिरुद मिरवणाऱ्या आरोग्य विभागाची सेवा चांगलीच ढेपाळली आहे. त्याचाच फायदा सध्या बोगस डॉक्टरांनी उचलला आहे. या बोगस डॉक्टरांनी आष्टी तालुक्यात चांगलाच कहर केला आहे. बनावट पदव्या आणि डिप्लोमांचा आधार घेत आष्टी तालुक्यात तब्बल २६ बोगस डॉक्टर विविध गावांमध्ये 'प्रॅक्टिस'च्या नावाखाली कार्यरत आहेत.


या डॉक्टरांना कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय ज्ञान नसल्यामुळे रुग्णांच्या जीवाशी जीवघेणा खेळ चालविला असल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र आरोग्य विभाग निद्रावस्थेत असल्यामुळे त्यांच्यावर कुणीही वचक ठेवायला तयार नाही. त्यामुळे आरोग्य विभाग आणि बोगस डॉक्टर यांचे साटेलोटे असल्याचा आरोप तालुक्यातील नागरिकांनी केला आहे. अंग अंगदुखी, हातपाय दुखणे शरीरातील विविध असलेल्या व्याधी, मूळव्याध, भगंदर, मांस पेशीच्या गाठी याचे ऑपरेशन सुद्धा हे बोगस डॉक्टर करीत आहे. मात्र अनेक लोकांच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांना उच्च पातळीच्या डोजेसचा वापर करून शरीरातील मजबूत अवयव लूज करण्याचा प्रकार सर्रास चालविला आहे. 


मुळव्याधीच्या १८ शस्त्रक्रिया अयशस्वी
२६ बोगस डॉक्टरपैकी ८ डॉक्टर मुळव्याधी, भगंदरचे ऑपरेशन करतात. मुळव्याधीची शस्त्रक्रिया करण्याच्या ठिकाणी भूल देतात. मात्र त्यांनी आतापर्यंत वर्षभरामध्ये शंभरावर शस्त्रक्रिया केल्या असून त्यापैकी १८ रुग्णांच्या शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यात. त्यामुळे या बोगस डॉक्टरांच्या हातून आपले ऑपरेशन यशस्वी झाले नसून त्यांनी खासगी डॉक्टरांकडे जाऊन पुन्हा ऑपरेशन करून घेतले. अशा डॉक्टरांवर तातडीने कारवाई करून गुन्हे दाखल करावे आणि त्यांना आष्टी तालुक्यातून हद्दपार करण्याची मागणी आहे.


या गावात सुळसुळाट...
आष्टी तालुक्यात साहूर, माणिकवाडा, तारासावंगा, बोरगाव, वडाळा, भारसवाडा, लहानआर्वी, अंतोरा, थार, चामला, बांबर्डा, बोरखेडी, आबाद किन्ही, मोई, खडकी, पांढुर्णा, पोरगव्हाण, पंचाळा तर तालुक्याच्या शेजारी असणाऱ्या कारंजा तालुक्यातील सारवाडी, जसापूर, किन्हाळा, पारडी, बोटोना, माळेगाव, झाडगाव या गावांमध्ये चांगलाच कहर आहे.


"आष्टी तालुक्यामध्ये बोगस डॉक्टर तपासणीची मोहीम सुरू होती. तीन बोगस डॉक्टर आढळले होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले असून प्रकरण न्यायालयात आहे. उर्वरित बोगस डॉक्टरांच्या प्रकरणात तत्काळ कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी तक्रारी करायला पाहिजे. त्यानुसार तत्काळ कारवाई करण्यात येईल."
- डॉ.एस.एम कासारे, तालुका आरोग्य अधिकारी,

Web Title: 26 bogus doctors in Ashti taluka of Wardhya! Piles surgeries failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :wardha-acवर्धा