महागड्या कारमधून दारु वाहतूक करणारे दोघे गजाआड; वाहनासह ९.३६ लाखांचा दारुसाठा जप्त

By चैतन्य जोशी | Updated: April 5, 2023 16:32 IST2023-04-05T16:30:47+5:302023-04-05T16:32:20+5:30

गुन्हे शाखेची रामनगर हद्दीत कारवाई

2 arrested for transporting liquor in an expensive car; Liquor worth 9.36 lakh seized along with the vehicle | महागड्या कारमधून दारु वाहतूक करणारे दोघे गजाआड; वाहनासह ९.३६ लाखांचा दारुसाठा जप्त

महागड्या कारमधून दारु वाहतूक करणारे दोघे गजाआड; वाहनासह ९.३६ लाखांचा दारुसाठा जप्त

वर्धा : अमरावती जिल्ह्यातून महागड्या कारमध्ये वर्धा शहरातून दारुसाठा आणणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान अटक केली. ही कारवाई ४ रोजी रात्री बॅचलर रोडवर करण्यात आली.

निखील रामेश्वर वाघमारे (३१) रा. गणेशनगर, पवन प्रल्हाद घुडे (३३) रा. पिपरी (मेघे) असे अटक केलेल्या दारुविक्रेत्यांची नावे आहे. तसेच मुकेश जयस्वाल याच्याविरुद्धही गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अमरावती जिल्ह्यातून दारुची अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी बॅचलर रोडवर नाकाबंदी केली असता एक पांढऱ्या रंगाची एम.एच. ३६ झेड. ५३५२ क्रमांकाची कार भरधाव येताना दिसली. पोलिसांनी कारला थांबवून पाहणी केली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात दारुसाठा आढळून आला. पोलिसांनी दोघांना अटक करुन कारसह ९ लाख ३६ हजार ७०० रुपयांचा दारुसाठा जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांनी केली
 

Web Title: 2 arrested for transporting liquor in an expensive car; Liquor worth 9.36 lakh seized along with the vehicle