ट्रकला बसची धडक, १६ प्रवाशांना दुखापत; नागपूर-हैदराबाद मार्गावरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2022 17:00 IST2022-07-23T16:58:47+5:302022-07-23T17:00:46+5:30
दोन्ही वाहनांत धडक होताच ट्रक रस्त्याच्या कडेला उतरून उलटला. तर अनियंत्रित झालेली बस थेट रस्ता दुभाजकावर चढली.

ट्रकला बसची धडक, १६ प्रवाशांना दुखापत; नागपूर-हैदराबाद मार्गावरील घटना
समुद्रपूर (वर्धा) : हैदराबादकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या बसने ट्रकला मागाहून धडक दिली. अपघात होताच ट्रक रस्त्याच्या कडेला जात उलटला. तर बस अनियंत्रित होत रस्ता दुभाजकावर चढली. या भीषण अपघातात बसमधील १६ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. तर ट्रक आणि बसच्या चालकालाही दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात शनिवारी पहाटे ५.४५ वाजताच्या सुमारास नागपूर-हैदराबाद मार्गावर जाम शिवारात झाला. एम. एच. ४० सी. डी. ७४३९ क्रमांकाचा ट्रक नागपूरच्या दिशेने जात होता. ट्रक जाम शिवारात येताच हैदराबादकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या टी. एस. ०८ झेड. ०२२४ क्रमांकाच्या बसने ट्रकला मागाहून जबर धडक दिली. दोन्ही वाहनांत धडक होताच ट्रक रस्त्याच्या कडेला उतरून उलटला. तर अनियंत्रित झालेली बस थेट रस्ता दुभाजकावर चढली.
अपघात झाल्याची माहिती मिळताच जाम येथील महामार्ग पाेलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सपाटे, किशोर येळणे, अजय बेले, गौरव खरवडे, सुनील श्रीनाथ यांनी तातडीने घटनास्थळ गाठून जखमींना समुद्रपूर येथील रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद समुद्रपूर पोलिसांनी घेतली आहे.