Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
Ramtek Loksabha Election: लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरली आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांनी कटकारस्थान करून रात्रभरात माझे जातवैधता प्रमाणपत्र रद्द केले असा आरोप रश्मी बर्वेंनी केला. ...
Hingoli Loksabha Seat: हिंगोली लोकसभा मतदारसंघातून बाबुराव कदम कोहळीकर यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली असून त्यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभा घेतली. त्या सभेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला. ...
Loksabha Election 2024: बीड आणि भिवंडी मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. भिवंडी मतदारसंघावरून महाविकास आघाडीत वाद सुरू होता. परंतु या जागेवरही पवारांनी उमेदवार दिला आहे. ...
Sharad Pawar : सध्या भाजपमध्ये असलेल्या मोहिते पाटील कुटुंबाच्या घरवापसीची चर्चा रंगत असून धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. ...
VBA Panjabrao Dakh: गेल्या काही दिवसांत वंचितने तिसरा उमेदवार बदलला आहे. काही दिवसांपूर्वी परभणीतून प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेब उगले यांना उमेदवारी दिली होती. ...
Loksabha Election 2024: राज ठाकरे हे महायुतीसोबत जातील अशी चर्चा राजकारणात सुरू आहे. त्यात उद्धव ठाकरे पक्षफुटीनंतर अनेकांशी जुळवून घेतात मग राज ठाकरेंच्या मनसेसोबत का नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यावर संजय राऊतांनी थोडक्यात उत्तर दिले. ...