Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
उस्मानाबाद लोकसभेतील महायुतीच्या जागेचा अन् उमेदवारीचाही गुंता अखेर सुटला आहे. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचा ऐनवेळी अजित पवार गटात प्रवेश घडवून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ...
Congress Prithviraj Chavan News: मागच्या वेळेस वंचित आणि एमआयएम यांच्या वेगळ्या उमेदवारीमुळे नऊ ठिकाणी भाजपाचे अतिरिक्त खासदार निवडून आले. मत विभाजन करू नये, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: भाजपने माढ्यातून खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने नाराज असलेल्या अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्यातील धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite Patil) यांनी बुधवारी रात्री उशीरा मुंबईत शरद पवा ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: आरोग्य क्षेत्रासाठी काय योगदान देणार आहोत याची माहिती राजकीय पक्षांनी निवडणूक जाहीरनाम्यात दिली पाहिजे, असे मत आरोग्याच्या चळवळीत काम करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञ आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. ...
Sushma Andhare News: भाजपावाले टेंभी नाक्याकडे वाटाघाटीसाठी आले नाही तर त्यांना मुजरा करण्यासाठी दिल्लीला पाचारण करण्यात आले, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली. ...
Maharashtra Lok sabha Election 2024: काही दिवसांपूर्वी अजित पवारांची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश करणारे बजरंग सोनावणे यांना शरद पवार यांनी बीडमधून उमेदवारी दिली. भिवंडीतून सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे उमेदवारी देण्यात आली आहे. ...