Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. Read More
काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी वंचित, बहुजन, भटके व अल्पसंख्याकांना किती स्थान दिले, याचे उत्तर द्यावे. यावेळी उमेदवार नरसिंग उदगीरकर, संतोष सूर्यवंशी, डी.एन. नरसिंगे, अण्णा जाधव, प्रा. राजेंद्र ढवळे, श्याम कांबळे उपस्थित होते. ...
पुरंदर तालुक्यातील नीरा येथे आज गुरुवार (दि.२) रोजी खा. सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रचारासाठी झालेल्या सभेमध्ये शरद पवार यांनी मोदी सरकारवर आणि त्यांनी राबवलेल्या धोरणांवर सडकून टीका केली. ...
सांगली लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून उद्धवसेना व काँग्रेसमध्ये वाद झाला. त्यामुळे देशभर व राज्यभर सांगली लोकसभेची निवडणूक गाजली आहे. अखेर सांगलीची जागा मिळवीत उद्धवसेनेने पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. ...