अखेर शिंदेसेनेच्या मनासारखे झाले अन् भाजप स्वबळावर
By सदानंद नाईक | Updated: January 5, 2026 09:56 IST2026-01-05T09:56:48+5:302026-01-05T09:56:48+5:30
आता निवडणुकीनंतर भाजप-शिंदेसेना एकत्र येतात की भाजपला शिंदेसेना सत्तेबाहेर ठेवते, याकडे लक्ष लागले आहे.

अखेर शिंदेसेनेच्या मनासारखे झाले अन् भाजप स्वबळावर
सदानंद नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर : पालिका निवडणुकीत शिंदेसेनेने ओमी कलानी व स्थानिक साई पक्षासोबत युती करून भाजपला एकाकी पाडून कोंडीत पकडण्याची खेळी केली होती. युती करण्याचा आदेश दिल्लीहून आल्यावर हीच युती शिंदेसेनेच्या ‘गले की हड्डी’ बनली. कारण, भाजपने युतीत ज्या जागा शिंदेसेनेला मिळतील, त्यातून त्यांनी ओमी टीम व साई पक्षाला सोडाव्यात, अशी भूमिका भाजपने घेतली. अखेरीस शिंदेसेनेच्या मनातील सुप्त इच्छा खरी ठरली व त्यांची युती विरुद्ध स्वबळावरील भाजप लढत होत आहे. आता निवडणुकीनंतर भाजप-शिंदेसेना एकत्र येतात की भाजपला शिंदेसेना सत्तेबाहेर ठेवते, याकडे लक्ष लागले आहे.
उल्हासनगर म्हणजे सिंधी समाजाचे शहर हे चित्र बदलत असून, मराठी व उत्तर भारतीय टक्का वाढत आहे. पालिका स्थापनेपासून सर्वाधिक काळ महापौरपद शिवसेनेकडे राहिले. शिंदेसेनेने महापौरपद स्वतःकडे ठेवण्यासाठी ओमी कलानी व साई पक्षासोबत युती केली.
महापौरपद स्वतःकडे ठेवण्यासाठी
उल्हासनगर म्हणजे सिंधी समाजाचे शहर हे चित्र बदलत असून, मराठी व उत्तर भारतीय टक्का वाढत आहे. महापालिका स्थापनेपासून सर्वाधिक काळ महापौरपद शिवसेनेकडे राहिले आहे. यावेळी शिंदेसेनेने महापौरपद स्वतःकडे ठेवण्यासाठी ओमी कलानी व स्थानिक साई पक्षासोबत युती केली. एकूण ७८ जागांपैकी ३५, ३२ व ११ असे जागा वाटप झाले.
ओमी टीमचे समर्थक उमेदवार शिंदेसेनेच्या चिन्हावर उभे ठाकले, तर साई पक्ष स्वतंत्र चिन्हावर उभे आहेत. प्रभाग क्र.१२ मधील कलानी समर्थक स्वतंत्र चिन्हावर लढत आहेत. तर भाजपने ७८ जागांवर उमेदवार देऊन शिंदेसेना युतीला आव्हान दिले. साई पक्षाचे एकूण ११ वॉर्ड, प्रभाग क्र.१२ व १८ मध्ये शिंदेसेनेच्या चिन्हावर एकही उमेदवार उभा नाही.
साई, पीआरपीकडे सत्तेची चावी
शिंदेसेना महायुतीतील साई पक्षाचे ११, पीआरपीचे-चार व ओमी टीमचे चार उमेदवार स्वतंत्र चिन्हावर उभे आहेत. यापैकी निवडून आलेल्या नगरसेवकांकडे सत्तेची चावी राहणार आहे. स्थानिक साई पक्षांकडे सत्तेची चावी गेल्या १५ वर्षांपासून आहे.