शिंदेसेनेतच होणार ‘टफ फाइट’; आरक्षण सोडतीनंतर ठाणे महापालिकेची समीकरणे बदलली !

By अजित मांडके | Updated: January 23, 2026 10:57 IST2026-01-23T10:51:51+5:302026-01-23T10:57:32+5:30

ठाण्याचे महापौरपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे

There will be a 'tough fight' within Shinde Sena; Thane Municipal Corporation's equations changed after the reservation draw! | शिंदेसेनेतच होणार ‘टफ फाइट’; आरक्षण सोडतीनंतर ठाणे महापालिकेची समीकरणे बदलली !

शिंदेसेनेतच होणार ‘टफ फाइट’; आरक्षण सोडतीनंतर ठाणे महापालिकेची समीकरणे बदलली !

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाण्याचे महापौरपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे दिग्गजांच्या आशा मावळल्या असून, शिंदेसेनेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील ५ महिला आणि दोन पुरुष नगरसेवकांची नावे स्पर्धेत आहेत. १३१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी ९, अनुसूचित जमातीसाठी ३, नागरिकांचा मागासवर्गसाठी (ओबीसी) ३५ तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ८४ जागा होत्या. 

शिंदेसेनेतून अनुसूचित जाती प्रवर्गातून ७ नगरसेवक विजयी झाले आहेत. यामध्ये पद्मा भगत (प्रभाग ३-अ, महिला), वनिता घोगरे (प्रभाग ६-अ), विमल भोईर (प्रभाग ७-अ), गणेश कांबळे (प्रभाग ९-अ), डॉ. दर्शना जानकर (प्रभाग १६-अ), आरती गायकवाड (प्रभाग २४-अ) आणि दीपक जाधव (प्रभाग २८-अ) यांचा समावेश आहे. या सातपैकी कोणाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव ९ जागांपैकी ७ जागा शिंदेसेनेकडून तर २ जागा भाजपकडून लढविण्यात आल्या होत्या. आरती गायकवाड कळव्यातील प्रभाग २४ मधून निवडून आल्या आहेत, तर दीपक जाधव हे दिव्यातून पहिल्यांदा निवडून आले आहेत.

  • पद्मा भगत : प्रभाग क्रमांक ३ मधून सलग तीन वेळा निवडून आल्या आहेत. परंतु, महापालिकेच्या सभागृहात त्यांची विशेष छाप दिसून आलेली नाही. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या पॅनलमधील आहेत. 
  • वनिता घोरगे : प्रभाग क्रमांक ६ अ मधून पहिल्यांदा निवडून आल्या आहेत. इतर नगरसेवकांच्या तुलनेत नवख्या आहेत. 
  • विमल भोईर : प्रभाग क्रमांक ७ अ मधून सलग तिसऱ्यांदा निवडून आल्या. त्यांनी मागील दोन्ही सत्रांमध्ये महापालिकेचे सभागृह गाजविले आहे. महापालिकेत काकी म्हणून ओळखल्या जातात. 
  • गणेश कांबळे : प्रभाग क्रमांक ९ अ मधून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. प्रभागात त्यांची छाप असली तरी सभागृहात मात्र त्यांची विशेष दखल घेतलेली दिसली नाही. 
  • डॉ. दर्शना जानकर : प्रभाग क्रमांक १६ अ मधून पहिल्यांदाच निवडणूक लढविली. डॉक्टर असल्याने सुशिक्षित चेहरा म्हणून पाहिले जाते. पती योगेश जानकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. 

Web Title : शिंदे सेना में कड़ी टक्कर; ठाणे महानगरपालिका के समीकरण बदले!

Web Summary : ठाणे का महापौर पद अनुसूचित जाति के लिए आरक्षित होने से शिंदे सेना में प्रतिस्पर्धा तेज है। पद्मा भगत, विमल भोईर और डॉ. दर्शना जानकर समेत सात पार्षद दौड़ में हैं। अंतिम निर्णय का इंतजार है।

Web Title : Tough fight within Shinde Sena; Thane civic polls equations shift!

Web Summary : Thane's mayoral post is reserved for Scheduled Castes, intensifying competition within Shinde Sena. Seven corporators are in contention including Padma Bhagat, Vimal Bhoir and Dr. Darshana Jankar. The final decision is awaited.