ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश
By प्रज्ञा म्हात्रे | Updated: December 27, 2025 22:58 IST2025-12-27T22:57:25+5:302025-12-27T22:58:45+5:30
Thane Municipal Corporation Election: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव आणि भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजन गावंड यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश
ठाणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव आणि भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजन गावंड यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
यावेळी मनसेतून शिंदेसेनेत आलेलेराजन गावंड म्हणाले की: मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे त्यामुळे मी त्यांच्या शिवसेनेत आलो. मनसेमध्ये राजकारणातले बरेचसे धडे गिरवले, अनेक अनुभव देखील आले. परंतु सध्याची एकूण राजकीय परिस्थिती पाहता असे लक्षात शिंदेंची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे म्हणून या पक्षात येण्याचा निर्णय घेतला.
यावेळी शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांच्यासह भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक पाटील, राष्ट्रीय कोषाध्यक्ष राम शिंदे, जनसंपर्क प्रमुख राज ठाकूर, मनसेचे जिल्हा सचिव ॲड. शैलेंद्र करले, भिवंडीचे मनसे विभाग अध्यक्ष शिनाथ भैरी, अनिल पवार, राजू प्रेस्थान तसेच ठाणे जिल्हा प्रकल्पग्रस्त हितकारी कृती समितीचे जिल्हा सचिव कुणाल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम पाटील आणि यश शिंदे, हनुमंत भुरके, तसेच मानवता सेवा संघाचे पदाधिकारी शिव वाघेरा, प्रतीक्षा वाघेरा, प्रियांका वाघेरा, हर्षल वाघेरा, अनिता जाधव, सरिता चारु, प्रतिभा चित्ते, शरद शिंदे यांनीही यावेळी हाती भगवा धरत शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला.