उल्हासनगरातील ननावरे पतीपत्नी आत्महत्येचे कनेक्शन फलटण, सपकाळेसह तिघावर गुन्हा
By सदानंद नाईक | Updated: August 2, 2023 19:55 IST2023-08-02T19:55:17+5:302023-08-02T19:55:34+5:30
माजी आमदार पप्पू कलानी व ज्योती कलानी यांचे स्वीयसहायक राहिलेले नंदू ननावरे यांनी मंगळवारी राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरून पत्नीसह खाली उडी मारून आत्महत्या केली.

उल्हासनगरातील ननावरे पतीपत्नी आत्महत्येचे कनेक्शन फलटण, सपकाळेसह तिघावर गुन्हा
उल्हासनगर : माजी आमदार पप्पू कलानी व ज्योती कलानी यांचे स्वीयसहायक राहिलेले नंदू ननावरे यांनी मंगळवारी राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरून पत्नीसह खाली उडी मारून आत्महत्या केली. याप्रकाराने खळबळ उडाली असून नंदू यांच्या खिशात मिळालेल्या चिट्ठीवरून फलटण येथे राहणार संग्राम सपकाळे यांच्यासह तिघावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. उल्हासनगरचे माजी आमदार पप्पु कलानी व ज्योती कलानी यांचे स्वीयसहायक म्हणून काम केलेले नंदू ननावरे दोन पत्नी व मुलगा, मुलीसह राहत होते. मंगळवारी दुपारी अड्डीच वाजता पहिली पत्नी उज्वलासह ते घरात होते.
तर दुसरी पत्नी मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेली होती. पहिली पत्नी उज्वला हिची मुलागी कॉलज मध्ये गेली होती. त्यावेळी नंदू ननावरे यांनी पत्नी उज्वलासह घराच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली. याप्रकारने एकच खळबळ उडाली असून त्यांचे मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी आमदार बालाजी किणीकर, माजी आमदार पप्पु कलानी, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संघटक धनंजय बोडरे आदिसह अनेकांनी धाव घेऊन विचारपूस केली.
नंदु ननावरे यांच्या मृतदेहच्या खिशातून विट्ठलवाडी पोलिसांना एक चिट्ठी मिळाली. तर आत्महत्या करण्यापूर्वी नंदू यांने एक व्हिडिओ बनवून मोजकेच विश्वासू पोलीस अधिकारी व संबधितांना व्हायरल केला होता. अशी चर्चा शहरात रंगली आहे. पोलिसांना मिळालेल्या चिट्ठीच्या आधारे व नंदूच्या पुतण्याच्या तक्व फलटण येथे राहणारे संग्राम सपकाळे यांच्यासह ३ जणांवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली आहे. तर व्हायरल व्हिडिओ बाबत पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांनी बोलण्याचे टाळून तो तपासाचा भाग असल्याचे सांगितले. एकूणच चिट्ठी व व्हायरल व्हिडिओ मध्ये आहे काय? याबाबत चर्चा शहरात रंगली आहे. सध्यस्थीतीत नंदू ननावरे हे कलानी यांचे मंत्रालयातील काम व आमदार किणीकर यांच्या कार्यालयात येऊन जाऊन असत. असे बोलले जात आहे.
फलटण कनेक्शनमुळे खळबळ
फलटण येथील संग्राम सपकाळे यांच्यासह ३ जणांवर गुन्हे दाखल झाले. ही माणसे कोणाशी संबंधित आहेत. याचा तपास पोलीस करीत आहेत. स्थानिक आमदार व नंदू ननावरे यांच्यातील वादही एकेकाळी गाजला होता.