५१ लाखांच्या मेफेड्रॉनसह नायजेरियनला अटक, गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 18:56 IST2025-12-03T18:55:46+5:302025-12-03T18:56:04+5:30
पोलीस आयुक्त यांच्याकडून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश प्राप्त आहेत.

५१ लाखांच्या मेफेड्रॉनसह नायजेरियनला अटक, गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांची कारवाई
नालासोपारा (मंगेश कराळे) :- ५१ लाख रुपये किंमतीचा मेफेड्रॉन अंमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या नायजेरीयन आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाले आहे.
पोलीस आयुक्त यांच्याकडून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश प्राप्त आहेत. गुन्हे शाखा युनिट दोनची टीम सोमवारी संध्याकाळी नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर परिसरात अंमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्या आरोपींवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते. सोमवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हायटेंशन रोडवरील शमा बेकरीच्या समोर एक विदेशी नागरिक संशयास्पद फिरताना दिसला.
पोलिसांना संशय आल्याने त्याला थांबवून अंग झडती घेतली असता आरोपी उबा चिनोसो विस्डॉन्म नोसो उबा (३०) याच्याकडे ५१ लाख रुपये किंमतीचे २५५ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) नावाचा अंमली पदार्थ मिळून आला आहे. आरोपी विरोधात तुळींज पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक संतोष घाडगे (४१) यांनी मंगळवारी तक्रार देवून एनडीपीएस कायदा १९८५ चे कलम ८ (क), २२ (क) प्रमाणे मंगळवारी गुन्हा दाखल करत अंमली पदार्थ जप्त करून आरोपीला गुन्ह्यात अटक केली आहे.
उपरोक्त कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहा. पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उप निरीक्षक संतोष घाडगे, अजित गिते, सहा. फौज संजय नवले, मुकेश पवार, रविंद्र पवार, चंदन मोरे, मनोज मोरे, पोहवा प्रफुल्ल पाटील, प्रशांतकुमार ठाकुर, सचिन पाटील, जगदिश गोवारी, दादा आडके, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, अक्षय बांगर, मसूब रामेश्वर केकान यांनी केली आहे.