उल्हासनगरात तरुणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
By सदानंद नाईक | Updated: November 27, 2022 18:38 IST2022-11-27T18:37:49+5:302022-11-27T18:38:40+5:30
उल्हासनगरात तरुणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे.

उल्हासनगरात तरुणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील सम्राट अशोकनगर मध्ये राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणाला सकाळी पाण्याच्या मशीनचा इलेक्ट्रिकल वायर गुंडाळतात विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. दिपकच्या वडिलांचे लहानपणी छपर हरविले होते. गेल्या वर्षी पदवीची परीक्षा पास होऊन पुढील शिक्षण स्वतः घेत होता.
उल्हासनगर येथील सम्राट अशोकनगर मध्ये राहणार दीपक बनसोडे हा लहान असतांना वडिलांचा मृत्यू झाला. आजीने लहानाचे मोठे करून पदवी पर्यंत शिक्षण दिले. पदवीधर झाल्यानंतर दिपक काम करून पुढील शिक्षण घेत होता. सकाळी घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असून पाण्याच्या मशीनचा इलेक्ट्रिकल वायर गुंडाळीत होता. यावेळी त्याला विजेचा जोरदार धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आकस्मिक गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दीपक यांच्या आकस्मित मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केले जात असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.