उल्हासनगरमध्ये वंचित, साई पक्षाचा शिंदेसेनेला पाठिंबा; नगरसेवकांच्या गटाची नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 08:17 IST2026-01-22T08:14:53+5:302026-01-22T08:17:49+5:30

उल्हासनगर महापालिकेत बहुमतासाठी ४० नगरसेवकांची गरज आहे.

In Ulhasnagar Sai Party supports Shinde Sena Group of corporators registered with Divisional Commissioner | उल्हासनगरमध्ये वंचित, साई पक्षाचा शिंदेसेनेला पाठिंबा; नगरसेवकांच्या गटाची नोंदणी

उल्हासनगरमध्ये वंचित, साई पक्षाचा शिंदेसेनेला पाठिंबा; नगरसेवकांच्या गटाची नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर: महापौरपदासाठी वंचित, साई पक्ष आणि एका अपक्षाने पाठिंबा दिल्यामुळे शिंदेसेनेचे गणित जमले आहे. शिंदेसेनेच्या ३६ नगरसेवकांच्या गटाची बुधवारी कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केली. गटनेतेपदी अरुण अशान यांची निवड करण्यात आली. उल्हासनगर महापालिकेत बहुमतासाठी ४० नगरसेवकांची गरज आहे.

शिंदेसेनेसोबत वंचितचे २, साई पक्षाचा एक व एक अपक्ष हे नगरसेवक कोकण भवनला आले होते. शिंदेसेनेला पाठिंबा दिल्याची माहिती अशान व महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. वंचितच्या नगरसेवकांच्या गटाचीही नोंदणी केली. गटनेतेपदी सुरेखा सोनावणे यांची नियुक्ती केल्याचे वंचितचे प्रदेश प्रवक्ते सोनू पवार यांनी सांगितले. शिंदेसेनेसोबत असून, अपक्ष नगरसेवक सविता तोरणे-रगडे यांनी शिंदेसेनेला पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले. साई पक्षाच्या  दीप्ती दुधानी यांच्याशी संपर्क न झाल्याने  भूमिकेबाबत  माहिती मिळाली नाही. काँग्रेसचा एक नगरसेवक आहे. भाजपकडे ३७ नगरसेवक आहेत. मात्र शिंदेसेनेने वंचित, साई पक्ष व अपक्ष नगरसेवकाला  बाजूने वळवण्यात यश मिळवले.

Web Title : उल्हासनगर: शिंदे सेना को मिला समर्थन; पार्षदों के समूह का पंजीकरण

Web Summary : उल्हासनगर में, शिंदे सेना ने छोटे दलों और एक निर्दलीय से समर्थन प्राप्त किया, जिससे उनके 36 पार्षदों के समूह का पंजीकरण हुआ। यह गठबंधन उन्हें नगर निगम में बहुमत के करीब पहुंचने में मदद करता है। बीजेपी के 37 पार्षद और कांग्रेस का एक पार्षद है।

Web Title : Ulhasnagar: Shinde Sena Gains Support; Councilors' Group Registered

Web Summary : In Ulhasnagar, Shinde Sena secured support from smaller parties and an independent, registering their group of 36 councilors. This alliance helps them approach the majority mark in the municipal corporation. BJP has 37 councilors and Congress has one.