कामगारविरोधी धोरणाची अंमलबजावणी, पूर्वसूचना न देता टेक्नोक्राफ्ट कंपनी बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2020 05:29 IST2020-09-27T05:29:05+5:302020-09-27T05:29:34+5:30
नियमानुसार थकबाकी, भरपाई, सेवासमाप्तीपत्र, धनादेश कर्मचाऱ्यांच्या घरच्या पत्त्यावर पाठविले असल्याचे कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कामगारविरोधी धोरणाची अंमलबजावणी, पूर्वसूचना न देता टेक्नोक्राफ्ट कंपनी बंद
मुरबाड : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाची अंमलबजावणी शनिवारी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड एमआयडीसीतील टेक्नोक्र ाफ्ट कंपनीने केली. १० ते १२ वर्षांपासून कायम असणाऱ्या कामगारांना व्यवस्थापनाने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता अचानक कंपनी बंद करण्याचा निर्णय घेऊन कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे बेरोजगार झालेल्या कामगारांनी गेटसमोर निदर्शने करीत आपला संताप व्यक्त केला.
तरुणांना रोजगार मिळण्यासाठी वेगवेगळे उद्योग सुरू करण्यासाठी सरळगाव व पाटगाव येथे नव्याने एमआयडीसी सुरू करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारे आमदार किसन कथोरे यांना विचारले असता ते म्हणाले की, टेक्नोक्र ाफ्ट कंपनी बंद झाली, याबद्दल मला कोणत्याही प्रकारची कल्पना नाही. दरम्यान, नियमानुसार थकबाकी, भरपाई, सेवासमाप्तीपत्र, धनादेश कर्मचाऱ्यांच्या घरच्या पत्त्यावर पाठविले असल्याचे कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.