VIDEO: "...म्हणून मुंब्रा हिरवा करणार"; AIMIM च्या नगरसेविकेने त्या वक्तव्यावर दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 15:11 IST2026-01-21T15:10:36+5:302026-01-21T15:11:05+5:30

TMC Election 2026: ठाण्यात एमआयएमच्या नवर्निवाचित नगरसेविकेने केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

If My Flag Was Saffron I Would Have Promoted It AIMIM Sahar Shaikh Defends Her Green Mumbra Remark | VIDEO: "...म्हणून मुंब्रा हिरवा करणार"; AIMIM च्या नगरसेविकेने त्या वक्तव्यावर दिलं स्पष्टीकरण

VIDEO: "...म्हणून मुंब्रा हिरवा करणार"; AIMIM च्या नगरसेविकेने त्या वक्तव्यावर दिलं स्पष्टीकरण

AIMIM Corporator Sahar Shaikh: ठाणे महानगरपालिका निवडणुकीत यावेळी अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. विशेषतः मुंब्रा भागात एमआयएमने मुसंडी मारत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले आहे. प्रभाग क्रमांक ३० मध्ये एमआयएमचे संपूर्ण पॅनल निवडून आल्यानंतर, नवनिर्वाचित तरुण नगरसेविका सहर शेखचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एमआयएमच्या नगरसेवकाने मुंब्र्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत दिले.  पुढच्या निवडणूकीत संपूर्ण मुंब्रा हिरवा करुन टाकू असं म्हणत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सहर शेखने स्पष्टीकरण दिल.

निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सहर शेखने कार्यकर्त्यांना संबोधित करताना एक खळबळजनक विधान केले होते. "हा तर फक्त ट्रेलर आहे. पुढच्या निवडणुकीत मुंब्रा शहर संपूर्ण हिरवं करून टाकू. मुंब्र्यातून विरोधकांना पळवून लावू आणि इथला प्रत्येक उमेदवार एमआयएमचाच असेल," असं सहर शेखने म्हटलं. या या विधानाचा रोख थेट स्थानिक आमदार आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जितेंद्र आव्हाड यांच्याकडे होता असा दावा शेख यांनी केला. मात्र मुंब्रा हिरवा करू या विधानावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. विरोधकांनी यावरुन टीका केल्यानंतर सहर शेखने आपली बाजू स्पष्ट केली.

"आम्ही हिरव्या रंगाचा प्रचार करत आहोत, कारण माझ्या झेंड्याचा रंग हिरवा आहे. जर माझ्या झेंड्याचा रंग भगवा असता, तर मी त्याचा प्रचार केला असता. माझ्या झेंड्याच्या रंग हिरवा असल्याने मी मुंब्र्याला हिरवा करुन टाकणार आहे. मी हे पुन्हा बोलतेय. हे पक्षाच्या स्तरावरचं राजकारण होतं, पण विरोधकांनी त्याला जातीयवादाचं वळण दिलं. याचा कोणत्याही समुदायाशी संबंध नाही. रंगावर कोणाची मक्तेदारी असते का? लोकांनी हे जातीयवादी राजकारण थांबवलं पाहिजे. मी धर्मनिरपेक्ष आहे आणि मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की, मला मुंब्र्यातील सर्व २५ जागा जिंकायच्या आहेत," असं सहर शेखने म्हटले.  

मुंब्र्यात एमआयएमची ताकद

ठाणे महापालिकेत एमआयएमने यावेळी आपली ताकद दाखवून दिली आहे. राज्यातील १३ महापालिकांमध्ये एमआयएमने १२५ जागा जिंकल्या. ठाण्यात एमआयएमचे ५ उमेदवार विजयी झाले असून, त्यात प्रभाग ३० मधील नफिस अन्सारी, सहर शेख, शेख सुलताना आणि डोंगरे शोएब फरीद या संपूर्ण पॅनलचा समावेश आहे. एकाच प्रभागातून चारही उमेदवार निवडून आल्याने मुंब्र्यातील राजकारणात एमआयएमने आपली पकड मजबूत केल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title : AIMIM पार्षद का 'मुंब्रा हरा' बयान: विवाद के बाद स्पष्टीकरण

Web Summary : AIMIM पार्षद सहर शेख ने आलोचना के बाद अपने 'मुंब्रा हरा' बयान को स्पष्ट किया। उन्होंने कहा कि यह उनके पार्टी के झंडे के रंग को संदर्भित करता है, सांप्रदायिकता को नहीं। शेख का लक्ष्य मुंब्रा की सभी 25 सीटें जीतना है, जिससे ठाणे में AIMIM की उपस्थिति मजबूत होगी।

Web Title : AIMIM Corporator's 'Mumbra Green' Statement: Explanation Following Backlash

Web Summary : AIMIM corporator Sahar Shaikh clarified her 'Mumbra Green' statement after facing criticism. She stated it referred to her party flag's color, not communalism. Shaikh aims to win all 25 Mumbra seats, strengthening AIMIM's presence in Thane.