बाप्पा च्या इकोफ्रेंडली मकरच्या साहित्यावर  जी एस् टी.चा  भार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 08:29 PM2019-08-29T20:29:04+5:302019-08-29T20:31:22+5:30

पर्यावरणाला हानिकारक ठरू पाहणाऱ्या  थर्माकोलला बंदी असल्याने पर्यावरण पुरक इकोफ्रेंडली मखरांना गणेश भक्तांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. 

GST loads on Bappa's eco-friendly Capricorn | बाप्पा च्या इकोफ्रेंडली मकरच्या साहित्यावर  जी एस् टी.चा  भार

बाप्पा च्या इकोफ्रेंडली मकरच्या साहित्यावर  जी एस् टी.चा  भार

Next

उमेश जाधव, टिटवाळा-: अवघ्या दोन दिवसांवर येऊन‌ ठेपलेल्या गणेशोत्सव यामुळे सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु आहे. विविध सजावटीच्या साहित्यांनी  बाजारपेठा फुलल्या आहेत.  गणेशभक्तांची सर्वत्र खरेदेची लगबग पाह्याला मिळत आहे.  सजावटीसाठी लागणारे  मखर यासाठी पर्यावरण पुरक सजावटीला वाढती मागणी दिसून येत आहे. पर्यावरणाला हानिकारक ठरू पाहणाऱ्या  थर्माकोलला बंदी असल्याने पर्यावरण पुरक इकोफ्रेंडली मखरांना गणेश भक्तांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. 

कल्याण तालुक्यातील मोहने गावातील युवक संतोष कदम व टिटवाळ्यातील रूपेश खिस्मतराव यांनी एकत्र येत के. के. एंंटरप्राईजच्या माध्यमातून  काचेच्या मंदिरांंची एक आकर्षक इकोफ्रेंडली श्रेणी बाप्पाच्या मखरांसाठी गणेशभक्तांसाठी उपलब्ध केली आहे. यांमध्ये कागदीपुठ्ठे व स्पंज, काचेचे विविध आकाराचे छोटखानी आरसे, रंगीत टिकल्या कापडी कुत्रिम डायमंड रबिन  यांच्या साहयाने सुबक, कोरीव, कलाकुसर साकरत नेत्रदीपक अशी काचेची कैलास मंदिरे, सुर्य मंदिरे, सुवर्ण मंदिरे अशा अनेक श्रेणी मध्ये दोन फुट उंची पासुन, सहाफुट उंचीपर्यंत मोहक, सुंदर इकोफ्रेंडली मंदिरे सर्वसामान्य गणेशभक्तांना परवडण्यासारख्या दरात विक्रीसाठी मोहने  शिवसंकुल जवळ, छबीलदास हायस्कूल समोर दादर, वाशी शिवाजी चौक येथे उपलब्ध केली आहेत.     त्यांच्या माध्यमातून समाजातील, गरजु युवक व महिला यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. 

के.के.एंंन्टरप्राईज् चे युवा होतकरु उघोजक संतोष कदम, रूपेश खिस्मतराव , व्यवस्थापक सहकारी मयुर तळेकर, गेली १४वर्षी पासुन गणपती बाप्पा साठी मकर बनविण्याचा उघोग करत असुन वर्षेभर मोहने येथील त्यांंच्या  कारखान्यात गरजु सोळा विघार्थी काँलेजच्या शैक्षणिक सत्रानंतरच्या  वेळेत दरदिवशी तीन तास मकर बनविण्याचे काम करत दरमहा सरसरी सात हजार रुपये उत्पन्न कमवितात. तर मोहने परिसरातील गरजु अठरा महिला आपले घरकाम संभाळुन  कारखान्यात मकर बनविण्याचे काम करुन आठ हजारांहून जास्त दरमहा उत्पन्न घेत आहेत. 

  "यंदा मकर बनिविण्याच्या साहित्यांना लागलेल्या जी एस् टी  ने   मकर उत्पादन खर्च पाहता  धंदा करणे थोडे कठीण होते. पर्यावरण पुरक मकरच्या कच्या मालास जी एस् टी मधुन सरकारने सुट दिल्यास  काचेच्या मंदिराच्या श्रेणी गणेशभक्तांना आणखी सवलती च्या दरात उपलब्ध करुन देता येतील असे  संतोष कदम यांनी सांगितले."

Web Title: GST loads on Bappa's eco-friendly Capricorn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.