भिवंडी महापालिकेमध्ये भाजपचे पाच उमेदवार आले बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 15:12 IST2026-01-03T15:12:00+5:302026-01-03T15:12:34+5:30
पालिका निवडणुकीत पहिल्यांदा बिनविरोध निवडून येण्याचा विक्रम या निवडणुकीत भाजपने आपल्या नावावर नोंदवला आहे.

भिवंडी महापालिकेमध्ये भाजपचे पाच उमेदवार आले बिनविरोध
भिवंडी : अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर गुरुवारी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पुतण्या सुमित पाटील हे प्रभाग १७ मधून बिनविरोध निवडून आल्याने भाजपच्या बिनविरोध उमेदवारांची संख्या सहा झाली आहे. पालिका निवडणुकीत पहिल्यांदा बिनविरोध निवडून येण्याचा विक्रम या निवडणुकीत भाजपने आपल्या नावावर नोंदवला आहे.
प्रभाग क्रमांक १८ अ - अश्विनी फुटाणकर, प्रभाग क्रमांक १८ ब - दीपा दीपक मढवी, प्रभाग क्रमांक १८ क - अबूसूद अशफाक अहमद शेख, प्रभाग क्रमांक १६ अ - परेश चौघुले, प्रभाग क्रमांक २३ ब मधून भारती हनुमान चौधरी हे बिनविरोध विजयी झाले आहेत.
काँग्रेस, समाजवादी पक्ष निवडणूक स्वबळावर लढविणार आहेत. भाजप, शिंदेसेनेची युती असून राष्ट्रवादी (शरद पवार), राष्ट्रवादी (अजित पवार) स्वबळावर लढत आहेत.