गणेशोत्सवादरम्यान डोंबिवलीत जमा झाले 40 टन 260 किलो निर्माल्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 03:54 PM2019-09-13T15:54:45+5:302019-09-13T15:55:25+5:30

गणेश विसर्जनाच्या वेळी निर्माल्य आणि इतर डेकोरेशन चा कचरा सरळ जलाशयात न टाकता तो शास्त्रीय पद्धतीने गोळा करणे ही पर्यावरणीय रक्षणाच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे.

During the Ganeshotsav, 40 tonnes of 260 kg Nirmalya were collected in Dombivali | गणेशोत्सवादरम्यान डोंबिवलीत जमा झाले 40 टन 260 किलो निर्माल्य

गणेशोत्सवादरम्यान डोंबिवलीत जमा झाले 40 टन 260 किलो निर्माल्य

Next

डोंबिवली - गणेश विसर्जनाच्या वेळी निर्माल्य आणि इतर डेकोरेशन चा कचरा सरळ जलाशयात न टाकता तो शास्त्रीय पद्धतीने गोळा करणे ही पर्यावरणीय रक्षणाच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. त्या दृष्टीने या कामी डोंबिवलीत निर्मल युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून सुमारे ४० टन २६० किलो निर्माल्य, २० टन १९५ किलो प्लास्टिक, १२ टन घनकचरा असे वर्गीकरण करून जलस्त्रोतात जाण्यापासून वाचवण्यात आले व जलप्रदूषण टाळत निर्माल्य गणेश मंदिर संस्थानाच्या गांडूळखत निर्मितीसाठी सुपूर्त करण्यात आले.

 दीड ते अकरा दिवसांच्या गणेशोत्सव काळात या जेथे गणेश विसर्जन करण्यात आले त्या ठिकाणी विसर्जन घाटावर निर्माल्य संकलन करण्यात आले. ह्या वर्षी ही निर्मल युथ फाऊंडेशन , डोंबिवली संस्थेचे स्वयंसेवक निर्मल्य संकलनाचे कार्य  पूर्वेकडे आयरे गाव तलाव, पश्चिममेला  कोपर तलाव,जुनी डोंबिवली गणेश घाट, रेतीबंदर गणेश घाट, देवीचा पाडा, कुंभारखन पाडा येथे विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे सुमारे 350 हुन अधिक स्वयंसेवक भर पावसात कार्यरत असल्याचे निदर्शनास आले.

या कार्यास गतवर्षीपासून संस्थेसोबत साऊथ इंडियन आसोसिएशन व प्रगति या महाविद्यालयाच्या एन. एस.एस विभागाचे स्वयंसेवक तसेच जी. आर. पाटिल महाविद्यालयाचे विद्यार्थी, पर्यावरण दक्षता मंडळ संस्थेच्या रूपाली शाईवाले, घनकचरा व्यवस्थापन विभाग क.डो.म.पा. डोंबिवलीचे अधिकारी विलास जोशी, पूर्व विभागाचे स्वच्छता निरीक्षक अधिकारी विलास गायकवाड, पश्चिम विभागाचे राजेंद्र खैरे आणि राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, पवन पाटिल, नगरसेेेक दीपेेेश म्हात्रे, प्रकाश भोईर,  विकास म्हात्रे आणि संगिता पाटील यांचे सहकार्य मिळाले. पुढच्या वर्षीही विसर्जनाच्या वेळीही हे कार्य असेच सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

नाले, समुद्र इत्यादी जलाशयात निर्माल्य तसेच प्लास्टिक कचरा टाकल्यास प्रदूषण वाढते तसेच जलाशयातील जलचर प्राण्यांच्या शरीरात हा कचरा अडकू शकतो शिवाय त्यांच्या पर्यावरणीय अधिवासासही ह्या मुळे धोका निर्माण होतो आणि जैवविविधता  नष्ट होऊ लागते आणि सृष्टीचे चैतन्य हरवते. त्यामुळे संस्थेने नागरिकांना आवाहन केले होते की आपल्या घरच्या अथवा मंडळाचा गणपती विसर्जित करताना निर्माल्य संकलनासाठी स्वतःहून जबाबदारीने निर्मल युथ फाऊंडेशन च्या कार्यकर्त्यांना सहकार्य करावे अशा पद्धतीने जनजागृती करण्यात आली होती.

त्यानुसार या संस्थेद्वारे आयोजित व राबवण्यात येणाऱ्या आगळ्या वेगळ्या निर्माल्य संकलनाच्या योजनेमुळे डोंबिवली शहराचे नागरीक सजग होत आहेत व पर्यावरणपूरक सण साजरे होण्यास चालना मिळत आहे तसेच त्या त्या विभागात विकासाची गती वाढून स्वच्छतेचा व प्रदूषण टाळण्याचा संदेश पोहचल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Web Title: During the Ganeshotsav, 40 tonnes of 260 kg Nirmalya were collected in Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.