मीरा-भाईंदरच्या महापौर पदी भाजपाच्या डिम्पल मेहता, तर उपमहापौरपदी ध्रुवकिशोर पाटील यांची वर्णी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 17:55 IST2026-01-30T17:52:48+5:302026-01-30T17:55:30+5:30

महापौर पदासाठी भाजपाच्या वतीने माजी महापौर तथा आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिंपल मेहता यांची वर्णी लागणार आहे. तर उपमहापौर पदी मेहता यांच्या मर्जीतले ध्रुवकिशोर पाटील यांची वर्णी लागणार, हे निश्चित झाले आहे.

BJP's Dimple Mehta has been elected as the mayor of Mira-Bhayander, while Dhruvkishore Patil has been elected as the deputy mayor. | मीरा-भाईंदरच्या महापौर पदी भाजपाच्या डिम्पल मेहता, तर उपमहापौरपदी ध्रुवकिशोर पाटील यांची वर्णी 

मीरा-भाईंदरच्या महापौर पदी भाजपाच्या डिम्पल मेहता, तर उपमहापौरपदी ध्रुवकिशोर पाटील यांची वर्णी 

मीरा रोड: मीरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर पदासाठी भाजपाच्या वतीने माजी महापौर तथा आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिंपल मेहता यांची वर्णी लागणार आहे. तर उपमहापौर पदी मेहता यांच्या मर्जीतले ध्रुवकिशोर पाटील यांची वर्णी लागणार, हे निश्चित झाले आहे. 

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी आज शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भाजपाच्या वतीने महापौर पदासाठी डिंपल मेहता यांनी उमेदवारी दाखल केला आहे. तर ध्रुवकिशोर पाटील यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरला आहे. 

महापालिकेत ९५ पैकी ७८ नगरसेवक भाजपाचे निवडून आल्याने महापौर व महापौर भाजपाचा होणार हे स्पष्टच आहे. यावेळी आमदार नरेंद्र मेहता, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप जैन सह अनेक नगरसेवक उपस्थित होते. 

दुसरीकडे मीरा-भाईंदर विकास आघाडीच्या वतीने काँग्रेसच्या रुबीना शेख यांनी  महापौर पदासाठी तर उपमहापौर पदासाठी शिंदेसेनेच्या वंदना विकास पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  

Web Title : मीरा-भायंदर: डिंपल मेहता महापौर, ध्रुवकिशोर पाटिल उपमहापौर

Web Summary : भाजपा की डिंपल मेहता मीरा-भायंदर की महापौर बनने के लिए तैयार हैं। ध्रुवकिशोर पाटिल उपमहापौर होंगे। नामांकन पत्र दाखिल किए गए। बहुमत के साथ भाजपा की जीत निश्चित है। कांग्रेस और शिंदे सेना के उम्मीदवारों ने भी नामांकन दाखिल किया।

Web Title : BJP's Dimple Mehta Mayor, Dhruvakishore Patil Deputy Mayor of Mira-Bhayandar

Web Summary : Dimple Mehta of BJP is set to become the Mayor of Mira-Bhayandar. Dhruvakishore Patil will be the Deputy Mayor. Nomination papers have been filed. With a majority, BJP's victory is certain. Congress and Shinde Sena candidates also filed nominations.