भिवंडीत काँग्रेसचा महापौर! 'सेक्युलर फ्रंट'ची स्थापना झाल्यानंतर हालचालींना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 10:52 IST2026-01-25T10:52:20+5:302026-01-25T10:52:26+5:30

Bhiwandi Nizampur Municipal Corporation Election 2026 Result: महापौरपदासाठी राजकीय हालचाली सुरू झाल्या असून, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), समाजवादी पक्ष या पक्षांनी एकत्र येऊन 'भिवंडी सेक्युलर फ्रंट'ची स्थापना केली आहे. त्यामुळे येथे काँग्रेसचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Bhiwandi Nizampur Municipal Corporation Election 2026 Result: Congress Mayor in Bhiwandi! Movements gain momentum after formation of 'Secular Front' | भिवंडीत काँग्रेसचा महापौर! 'सेक्युलर फ्रंट'ची स्थापना झाल्यानंतर हालचालींना वेग

भिवंडीत काँग्रेसचा महापौर! 'सेक्युलर फ्रंट'ची स्थापना झाल्यानंतर हालचालींना वेग

भिवंडी - महापौरपदासाठी राजकीय हालचाली सुरू झाल्या असून, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), समाजवादी पक्ष या पक्षांनी एकत्र येऊन 'भिवंडी सेक्युलर फ्रंट'ची स्थापना केली आहे. त्यामुळे येथे काँग्रेसचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भिवंडीत काँग्रेसचे ३० नगरसेवक आहेत. तर राष्ट्रवादी (शरद पवार) चे १२ आणि समाजवादी पार्टीचे (सप) ६ नगरसेवक आहेत. हे पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढले होते. महापौरपदाबाबत झालेल्या बैठकीला काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी आ. रशीद ताहीर मोमिन, सपाचे आ. रईस शेख व राष्ट्रवादी (शरद पवार) चे शहराध्यक्ष शोएब खान यांच्या नेतृत्वात फ्रंटची स्थापना करण्यात आली.

'सेक्युलर फ्रंट'वर भाजपने केला गंभीर आरोप
नगरसेवकांची पळापळ होऊ नये, हिंदू महापौर होऊ नये, या भीतीने फ्रंट तयार केला आहे. सेक्युलॅरिझमच्या नावाखाली फक्त हिंदूंना बाजूला करून ते सेक्युलर आणि हिंदू जातीयवादी आहेत, असा अप्रत्यक्ष संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपचे अॅड. प्रेषित जयवंत यांनी केला. त्यामुळे आणखी काही दिवस आरोपाच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.

"भिवंडीत धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या तिन्ही पक्षांना कौल मिळाला आहे. आमची जबाबदारी वाढली आहे. सर्वधर्मसमभाव विचारधारेतून भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना केली. फ्रंटच्या विकासाला चालना मिळणार आहे." - आ. रईस शेख, समाजवादी पक्ष

Web Title : भिवंडी में कांग्रेस का महापौर? सेक्युलर फ्रंट बनने से हलचल तेज

Web Summary : कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और समाजवादी पार्टी ने 'भिवंडी सेक्युलर फ्रंट' बनाया, जिससे कांग्रेस का महापौर बनने का रास्ता खुल सकता है। भाजपा ने फ्रंट पर हिंदू विरोधी होने का आरोप लगाया। गठबंधन का उद्देश्य भिवंडी में धर्मनिरपेक्षता और विकास को बढ़ावा देना है।

Web Title : Congress Mayor in Bhiwandi? Secular Front Formation Gains Momentum

Web Summary : Congress, NCP, and Samajwadi Party formed the 'Bhiwandi Secular Front,' potentially paving the way for a Congress mayor. BJP criticized the front, alleging anti-Hindu bias. The alliance aims to promote secularism and development in Bhiwandi.