मतपेट्यांची पळवापळवी, प्रभाग ३ मध्ये मतपेट्यांची बस धरली रोखून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 23:41 IST2026-01-15T23:41:04+5:302026-01-15T23:41:37+5:30

 मानपाडा येथील प्रभाग क्रमांक तीन हा मतदार संघ सुरुवातीपासूनच यंदाच्या महापालिका निवडणुकीत गाजत आहे. कधी राजीनामा नाट्य तर  कधी वादग्रस्त ऑडिओ क्लिप  यावरून हा प्रभाग यंदाच्या निवडणुकीत चांगलाच गाजला होता.

Ballot box scam, ballot box bus stopped in Ward 3 | मतपेट्यांची पळवापळवी, प्रभाग ३ मध्ये मतपेट्यांची बस धरली रोखून

मतपेट्यांची पळवापळवी, प्रभाग ३ मध्ये मतपेट्यांची बस धरली रोखून

ठाणे : ठाण्यात मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री मतपेट्यांचा काहीसा घोळ झाल्याचे शहरातील काही भागात दिसून आले. प्रभाग क्रमांक१ मध्ये कोणत्याही बंदोबस्त शिवाय मतपेट्या घेऊन जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. तिकडे प्रभाग ३ मध्ये सेंट जेव्हीयर्स शाळेतून मतपेट्या घेऊन जाणारी बस शिंदे सेनेच्या उमेदवारांनी रोखून धरल्याने येथे अर्धा तासाहून अधिक काळ काहीसा गोंधळ दिसून आला. 

   मानपाडा येथील प्रभाग क्रमांक तीन हा मतदार संघ सुरुवातीपासूनच यंदाच्या महापालिका निवडणुकीत गाजत आहे. कधी राजीनामा नाट्य तर  कधी वादग्रस्त ऑडिओ क्लिप  यावरून हा प्रभाग यंदाच्या निवडणुकीत चांगलाच गाजला होता. गुरुवारी रात्री मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम मशीन वाहनातून मतदान मोजणी केंद्रात घेऊन जात होते. त्यावेळी  या वाहनात अपक्ष उमेदवार असल्याचा आरोप शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

तसेच त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी  ईव्हीएम मशीन घेऊन जाणारे वाहन रोखून धरले. यामुळे येथे  मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. तसेच दोन अपक्ष उमेदवारांना ही कोंडून ठेवले. या घटनेची माहिती मिळतात पोलीसही त्वरित तिथे पोहचले. पाऊण तास मतपेट्यांची बस रोखून धरण्यात आली होती. यावेळी अपक्ष आणि शिंदे सेनेचे पदाधिकारी आमने सामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. अखेर 11 च्या सुमारास येथून बस बाहेर काढण्यात आली. मात्र त्यानंतरही तणाव दिसून आला.
दुसरीकडे प्रभाग क्रमांक 1 मध्ये देखील मतपेट्या बंदोबस्त शिवाय नेट असल्याचा व्हिडिओ काहींनी काढला आणि त्याचा जाब देखील विचारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. 

काहींचा मत पेट्या पळवण्याचा प्रयत्न होता, त्याची माहिती मिळाल्यानंतर मी याठिकाणी आले. मतपेट्या घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी काहींनी बाहेरची लोकं बोलवली होती, त्यामुळेच आम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला, संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहे.
मीनाक्षी शिंदे - उमेदवार शिंदे सेना

मतपेट्या उशीर होऊनही गेल्या नव्हत्या,त्या का गेल्या नाहीत त्या पाठवून द्याव्यात यासाठी येथे आलो होतो, आणि प्रशासणाबरोबर चर्चा देखील सुरू होती. मात्र आमच्यावर चुकीचा आरोप लावण्यात आला.
मधुकर पावशे - अपक्ष उमेदवार

Web Title : मतपेटी अराजकता: ठाणे में चुनाव के बाद तनाव बढ़ा

Web Summary : ठाणे चुनाव के बाद, मतपेटी से छेड़छाड़ से अशांति फैल गई। वार्ड 3 में, मतपेटियों से भरी एक बस को शिंदे सेना ने रोक दिया, जिसमें अनधिकृत व्यक्तियों का आरोप लगाया गया। तनाव बढ़ गया, पुलिस हस्तक्षेप की आवश्यकता पड़ी। वार्ड 1 में भी बिना सुरक्षा के मतपेटियों से विवाद हुआ, जिससे आरोप-प्रत्यारोप लगे।

Web Title : Ballot Box Chaos: Tensions Flare in Thane Post-Election

Web Summary : After Thane elections, ballot box mishandling sparked unrest. In Ward 3, a bus carrying ballot boxes was stopped by Shinde Sena, alleging unauthorized individuals. Tensions rose, requiring police intervention. Ward 1 also saw controversy with unguarded ballot boxes, fueling accusations and disputes.