विजेचा खांब अंगावर पडून कामगाराचा मृत्यू; सोहोळे येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 14:25 IST2020-08-12T14:23:08+5:302020-08-12T14:25:17+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

विजेचा खांब अंगावर पडून कामगाराचा मृत्यू; सोहोळे येथील घटना
ठळक मुद्देउपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात आणलेपुढील तपास कामती पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येत आहेलखन महादेव चंदनशिवे (वय २१ रा.वाघोली ता.मोहोळ) या कामगाराचा मृत्यू झाला
कामती : मोहोळ तालुक्यातील सोहाळे येथे विजेचा खांब उभा करण्यासाठी गेलेल्या लखन महादेव चंदनशिवे (वय २१ रा.वाघोली ता.मोहोळ) या कामगाराचा मृत्यू झाला आहे.
बुधवारी आज सकाळी वाघोली येथील यशवंत नाईकनवरे व लखन चंदनशिवे हे दोघेजण सोहाळे येथील एका शेतकºयाच्या शेतात विजेचा खांब उभा करण्यासाठी गेले होते. विजेच्या खांबावर चढल्यावर खांबासह लखन चंदनशिवे जमिनीवर कोसळल्याने त्याच्या डोकीला मार लागला.
यानंतर त्यास उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात आणले असता येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. सिव्हिल पोलीस चौकीत खबर दिली असून पुढील तपास कामती पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येत आहे.