Wherever there is power, there can be work; That is why we will cooperate with Bhalke: Dilip Dhotre | जिकडे सत्ता तिकडेच काम होऊ शकतात; म्हणूनच आम्ही भालकेंना सहकार्य करू : दिलीप धोत्रे

जिकडे सत्ता तिकडेच काम होऊ शकतात; म्हणूनच आम्ही भालकेंना सहकार्य करू : दिलीप धोत्रे

पंढरपूर : पंढरपुरातील अनेक प्रश्न सुटले नाहीत. काही अर्धवट कामे आहेत. जिकडे सत्ता असते तेच काम करू शकतात. त्यामुळे पोटनिवडणुकीत भालकेंना सहकार्य करणार असल्याचे मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी सांगितले.


मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे हे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रशांत गिड्डे, शशिकांत पाटील, अनिल बागल, बाळासाहेब चौगुले उपस्थित होते.

पुढे धोत्रे म्हणाले, विधानसभेच्या उमेदवाराचे निधन झाले. तर त्यांना श्रद्धांजली म्हणून मनसे निवडणूक लढत नाही. त्या विधानसभा सदस्यांच्या कुटुंबातील निवडणूक लढत असलेल्या सदस्याला मदत करण्याचे मनसेचे धोरण आहे. त्यामुळे आम्ही भालाकेंना मदत करत आहे.

त्याचबरोबर श्री विठ्ठल कारखाना अडचणीत असताना, कारखान्याला तन, मन धनाने मदत केली. संस्था राहीली पाहिजे. शेतकरी जगला पाहिजे त्यामागचा हाच हेतू होता. पोटनिवणुकीपुरतीच भालके यांना सहकार्य असू शकते. कदाचित श्री विठ्ठल कारखानाच्या निवडणुकीत आम्ही समोरासमोर असू शकतो असे दिलीप धोत्रे यांनी सांगितले.

Web Title: Wherever there is power, there can be work; That is why we will cooperate with Bhalke: Dilip Dhotre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.