माढा पंचायत समिती सभापतीपदी दुसºयांदा विक्रमसिंह शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 14:51 IST2019-12-31T14:50:46+5:302019-12-31T14:51:32+5:30
आमदार बबनराव शिंदे गटाचे वर्चस्व कायम; उपसभापतीपदी धनाजी जवळगे

माढा पंचायत समिती सभापतीपदी दुसºयांदा विक्रमसिंह शिंदे
ठळक मुद्दे- माढा पंचायत समितीसमोर बबनराव शिंदे गटाचा जल्लोष- निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदारांनी काम पाहिले- निवडीवेळी आमदार बबनराव शिंदे स्वत: उपस्थित होते
सोलापूर : माढा पंचायत समितीच्या सभापतीपदी विक्रमसिंह शिंदे यांची दुसºयांदा बिनविरोध निवड झाली़ याशिवाय उपसभापतीपदी धनाजी जवळगे याची निवड झाली़ निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार राजेश चव्हाण यांनी काम पाहिले.
माढा पंचायत समिती सभापती व उपसभापतीची निवडी पंचायत समिती सभागृहात झाल्या़ पंचायत समितीचे १४ सदस्य हे आमदार बबनराव शिंदे गटाचे असल्याने ही निवड बिनविरोध झाली. ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी आमदार बबनराव शिंदे स्वत: उपस्थित होते़ निवडीनंतर विजयी जल्लोष करण्यात आला.